• Download App
    जनावर : साक्षीवर मोहम्मद साहिल वार करत राहिला, बाकीचे पहात राहिले, कोणी वाचवायला पुढे नाही आले!! Mohd Sahil continued to attack Sakshi, others watched, no one came forward to save!!

    जनावर : साक्षीवर मोहम्मद साहिल वार करत राहिला, बाकीचे पहात राहिले, कोणी वाचवायला पुढे नाही आले!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीच्या शहाबाद डेरी परिसरात मोहम्मद साहिल 16 वर्षांच्या साक्षीवर वार करत राहिला. नंतर त्याने तिचे दगडाने डोके ठेचले. त्यावेळी बाकीचे पहात राहिले इकडे तिकडे जाऊन येत राहिले. पण साक्षीला वाचवायला कोणी पुढे आले नाही. त्यामुळे मोहम्मद साहिल घटनास्थळापासून पळून जाऊ शकला आणि त्याला आज उत्तर प्रदेशातल्या बुलंद शहर मधून पोलिसांनी अटक केली. Mohd Sahil continued to attack Sakshi, others watched, no one came forward to save!!

    दिल्लीतल्या ज्या लव जिहाद घटनेचा घटनेमुळे देशभर संताप उसळला असून लिबरल मीडियाने मात्र यातला लव्ह जिहाद अँगल लपवून ठेवत दिल्लीत अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या अशा स्वरूपाच्या बातम्या चालवल्या आहेत. दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी हा मुद्दा विशेषत्वाने अधोरेखित केला आहे. मोहम्मद साहिल सरफराज हा तिच्यावर वार करत राहिला पण कोणी वाचवायला तिला पुढे आले नाही. तो एकटाच जनावर नाही. बाकी सगळे जनावरच आहेत, अशा शब्दांत गौतम गंभीर यांनी संताप व्यक्त केला आहे.


    लव्ह जिहादचा प्रचार करणाऱ्या व्हायरल जाहिरातीवर VIP बॅग्जचा खुलासा जाहीर, त्याच्याशी कोणताही संबंध नाकारला


    मोहम्मद साहिल सरफराज हा हिंदू बनून साक्षी बरोबर रिलेशनशिपमध्ये होता. त्याचे शनिवारी तिच्याशी भांडण झाले होते. त्या रागातून त्याने शहाबाद डेअरी परिसरात तिच्यावर वार करून दगडाने ठेचून तिचा खून केला. पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्टच्या दिलेल्या माहितीनुसार साक्षीवर मोहम्मद साहिल याने 16 वार केले आहेत. त्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच सीसीटीव्ही फुटेज मध्ये मोहम्मद साहिल हा साक्षीवर वार करत होता पण तिला वाचवायला कोणी पुढे आले नाही. बाकीचे लोक इकडून तिकडे जात येत होते हे दिसत आहे. त्यामुळेच सोशल मीडिया वर प्रचंड संतापही व्यक्त होत आहे.

    Mohd Sahil continued to attack Sakshi, others watched, no one came forward to save!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!