• Download App
    मोहन यादव यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ|Mohan Yadav took oath as Chief Minister of Madhya Pradesh

    मोहन यादव यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

    Mohan Yadav

    • जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला झाले उपमुख्यमंत्री.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मध्य प्रदेशला आज नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. मोहन यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि इतर मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मोतीलाल नेहरू स्टेडियमवर शपथविधी सोहळा पार पडला.Mohan Yadav took oath as Chief Minister of Madhya Pradesh



    मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांनीही पदाची शपथ घेतली. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत घवघवीत विजय मिळवल्यानंतर भाजप हायकमांडने मोहन यादव यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड केली.

    मोहन यादव हे उज्जैन दक्षिणचे भाजपचे आमदार आहेत आणि ते राज्यातील एक मोठा ओबीसी चेहरा आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जवळचे मानले जातात.

    पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि विधानसभा अध्यक्ष तोमर मोहन यादव यांच्या शपथविधी सोहळ्यात व्यासपीठावर उपस्थित होते.

    नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात राज्याचे जुने मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी हात हलवून जनतेला शुभेच्छा दिल्या.

    Mohan Yadav took oath as Chief Minister of Madhya Pradesh

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका