भाजपने दोन उपमुख्यमंत्र्यांचीही केली आहे घोषणा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने अखेर ओडिशाच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली आहे. ओडिशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून मोहन चरण माझी यांची निवड करण्यात आली आहे. भाजप वरिष्ठ नेतृत्वाच्यावतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भूपेंद्र यादव यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मोहन चरण माझी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे.Mohan Charan Majhi to be the new Chief Minister of Odisha
दोन उपमुख्यमंत्रीही जाहीर केले
ओडिशासाठी मुख्यमंत्र्यांसोबतच दोन उपमुख्यमंत्रीपदही भारतीय जनता पक्षाने जाहीर केले आहे. पक्षाने कनकवर्धन सिंग देव यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवले आहे. यासोबतच राज्याला प्रवती परिदा यांच्या रूपाने महिला उपमुख्यमंत्रीही मिळाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागला?
नुकत्याच झालेल्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रथमच बहुमताने विजय मिळवला आहे. ओडिशा विधानसभेत एकूण 147 सदस्य आहेत. 4 जून रोजी जाहीर झालेल्या निकालात भाजपने 147 पैकी 78 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. नवीन पटनायक यांच्या बीजेडीने 51, काँग्रेस 14, सीपीआयएम 1 आणि इतरांना 3 जागा जिंकल्या आहेत.
Mohan Charan Majhi to be the new Chief Minister of Odisha
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने कर हस्तांतरणापोटी राज्यांना जारी केला 1,39,750 कोटी रुपयांचा हप्ता
- Modi Cabinet 2024 List: नड्डा आरोग्य मंत्री, निर्मला अर्थमंत्री, धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री झाले… पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
- Modi 3.0 : मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्यापेक्षा खातेवाटपात मोठी जबाबदारी आणि शिकण्याची संधी!!
- टी20 विश्वचषकात भारताविरोधात पाकिस्तानच्या पराभवावर दिल्ली पोलिसांची मजेदार पोस्ट