विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास काही दिवसच उरले असताना सगळ्याच राजकीय पक्षांच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सेलिब्रिटींची नावे देखील निवडणुकीच्या आखाड्यात येण्याची चर्चा जोरावर आहे. अशीच चर्चा सुपरस्टार क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्याबद्दल होत आहे. Mohammed Shami from the cricket field to the election arena
मोहम्मद शमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करून पश्चिम बंगाल मधून लोकसभेची निवडणूक लढवेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. स्वतः मोहम्मद शमी याने या शक्यतेला दुजोरा दिला. भाजपच्या काही नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला आहे, परंतु आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे मोहम्मद शमीने स्पष्ट केले.
मोहम्मद शमी जरी मूळचा उत्तर प्रदेशातला असला तरी तो पश्चिम बंगाल मधून रणजी ट्रॉफी मध्ये सहभागी होतो. त्यामुळे त्याचे प्रातिनिधिक राज्य पश्चिम बंगाल आहे. त्याला भाजप कमळ चिन्हावर पश्चिम बंगाल मधल्या एखाद्या मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमीने देखील त्या चर्चेला दुजोरा देऊन क्रिकेटच्या मैदानातून निवडणुकीच्या आखाड्यात येण्याच्या शक्यतेला बळ दिले आहे.
Mohammed Shami from the cricket field to the election arena
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिली भेट, महागाई भत्ता वाढवला!
- पवारांच्या तोंडी आमदाराला दमबाजीची भाषा; कलमाडींवर केलेला “तुपे पाटील” प्रयोग शेळकेंवर यशस्वी होण्याची अपेक्षा!!
- नरसिंह रावांच्या संकटमोचकाची कन्या भाजपमध्ये; पद्मजा करुणाकरण – वेणुगोपाल यांचा पक्षप्रवेश!!
- Delhi Liquor Policy: संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच; कोर्टाने पुन्हा वाढवली कोठडी
- मुंबईत ‘आरोग्य आपल्या दारी’ मोहीम