• Download App
    Mohabbat Ki Dauksan are going to dig Modi's grave!!, Prime Minister Narendra Modi slams them from Rajya Sabha मोहब्बत की दुकान खोलून बसलेल्यांना मोदींची कबर खोदायला निघालेत!!, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेतून घणाघात

    मोहब्बत की दुकान खोलून बसलेल्यांना मोदींची कबर खोदायला निघालेत!!, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेतून घणाघात

    Prime Minister

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लोकसभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसच्या महिला खासदारांचा हल्ला होणार असा पोलखोल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत उत्तरच दिले नाही. त्याउलट त्यांनी राज्यसभेत जाऊन राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रत्युत्तर दिले.Mohabbat Ki Dauksan are going to dig Modi’s grave!!, Prime Minister Narendra Modi slams them from Rajya Sabha

    यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि कम्युनिस्टांवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसच्या राजवटीतल्या वेगवेगळ्या चुकांचे वाभाडे काढून त्यांनी पश्चिम बंगाल आणि केरळ मधल्या प्रादेशिक पक्षांच्या राजवटींचाही पोलखोल केला.

    – राज्यसभेतल्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले :

    – मोदी पंतप्रधान पदावर आले, हे राजकीय सत्य अजूनही काँग्रेस पचवू शकलेली नाही. त्यामुळेच मोहब्बत की दुकान खोलून बसलेल्यांना मोदीची कबर खोदायची आहे.

    – मोदीची कबर तरी का खोदायची??, कारण मोदीने काँग्रेसच्या राजवटीतल्या चुका निस्तरल्या. 370 कलम हटवून जम्मू-काश्मीर मधल्या नागरिकांना भारतीय राज्यघटनेतले सर्व अधिकार प्रदान केले. काँग्रेसच्या राजवटीने कोट्यावधी खेड्यांना वीज दाखवली नव्हती, ती वीज मोदी सरकारने दाखवली, म्हणून मोहब्बत की दुकान खोलून बसलेल्यांना मोदीची खबर खोदायची आहे.

    – मोदींनी संरक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद केली. त्यामुळे सगळा देश सुरक्षित झाला. भारतीय जवान अभिमानाने फुलून आले. भारतीय जवानांना जगातली उत्तम सामग्री मिळाली. ती मोदीने दिली, म्हणून काँग्रेसवाल्यांना मोदीची कबर खोदायची आहे.

    – काँग्रेसवाल्यांच्या मनात शिखांविषयी प्रचंड द्वेष भावना भरली आहे म्हणून काँग्रेसवाल्यांनी कालच एका शीख खासदाराला गद्दार म्हटले. त्या शीख खासदाराच्या परिवाराने मोठी देश सेवा केली पण ते काँग्रेस मधून बाहेर पडल्याने काँग्रेसच्या शाही परिवाराने त्याला गद्दार म्हटले. मोदीने शिखांचा सन्मान केला म्हणून मोहब्बत की दुकान खोलून बसलेल्यांना मोदीची कबर खोदायची आहे.

    – अनेक लोक मला विचारतात, तुमच्या तंदुरुस्तीचे रहस्य काय??, तेव्हा मी त्यांना सांगतो, मी रोज दोन किलो शिव्या खातो. त्यामुळे मी तंदुरुस्त राहतो. 2002 पासून 2026 पर्यंत संसदेचे एकही अधिवेशन असे गेलेले नाही, की जिथे समोरच्यांनी मोदीला शिव्या दिल्या नाहीत. मोदी सामान्य घरातून वर आला, हे सत्य त्यांना पचलेच नाही. देशाचे पंतप्रधानपद ही आपल्याच कुटुंबाची जहागिरी आहे असे त्यांना वाटते पण मोदी त्यावर बसलाय म्हणून मोहब्बत की दुकान खोलून बसलेल्यांना मोदीची कबर खोदायची आहे.

    Mohabbat Ki Dauksan are going to dig Modi’s grave!!, Prime Minister Narendra Modi slams them from Rajya Sabha

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राज्याच्या औद्योगिक भविष्यासाठी भक्कम पायाभरणी; सर्व एक्सप्रेस वे आणि न्यू टाऊनच्या कामाला गती!!

    Saif al-Islam Gaddafi : लिबियाचे माजी हुकूमशहा गद्दाफींच्या मुलाची हत्या; घरात घुसून गोळी मारली; निवडणूक लढण्याची तयारी करत होते

    Sonam Wangchuk : सुप्रीम कोर्टाने केंद्राला म्हटले-वांगचुक यांच्या जामिनावर विचार करा; त्यांची तब्येत ठीक नाही, तुरुंगात 5 महिने झाले