• Download App
    मोदींची अरुणाचल प्रदेशाला 18000 कोटींची गॅरंटी; चीन सीमेवर मजबूत सुरक्षेसाठी सेला टनेलचीही निर्मिती!!Modi's guarantee of 18000 crores to Arunachal Pradesh

    मोदींची अरुणाचल प्रदेशाला 18000 कोटींची गॅरंटी; चीन सीमेवर मजबूत सुरक्षेसाठी सेला टनेलचीही निर्मिती!!

    विशेष प्रतिनिधी

    ईटानगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुणाचल प्रदेशाला आज 18000 कोटींची गॅरंटी दिली. 18000 कोटींच्या परियोजनांचे त्यांनी भूमिपूजन आणि लोकार्पण केले. त्यातली सगळ्यात महत्त्वाची परियोजना म्हणजे तवांग आणि दिरांग दरम्यानच्या सेला टनेलचे उद्घाटन!! Modi’s guarantee of 18000 crores to Arunachal Pradesh

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 मध्ये चीन सीमेजवळ जाऊन सेला टनेलचे भूमिपूजन केले होते, आज त्याचे उद्घाटन केले. तवांग आणि दिरांग दरम्यान त्यामुळे 12 किलोमीटरने अंतर कमी होऊन तब्बल 90 मिनिटांचा प्रवास वाचणार आहे, इतकेच नाही, तर या टनेलमुळे भारतीय लष्कराच्या हालचाली वेगवान होणार असून चीन सीमेवर मजबूत सुरक्षा व्यवस्थेसाठी सेला टनेलचा उपयोग होणार आहे. 24 तासांत 3000 कार आणि 2000 जड वाहने वाहतुकीची सेवा टनेलची क्षमता आहे. अर्थातच त्यामुळे भारतीय लष्कराची जड वाहने थेट चीन सीमेवर जाऊन धडकणार आहेत. भारताच्या रणनैतिक हिताच्या दृष्टिकोनातून सेला टनेलची निर्मिती अत्यंत महत्त्वाची आहे. या निर्मितीसाठी 850 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

    मोदी सरकारच्या सीमेवरची गावे “प्रथम” या धोरणांतर्गत तवांग आणि दिरांग परिसराचा विकास करण्यात येत असून तिथल्या अनेक परियोजनांचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी आज केले. तब्बल 18000 कोटी रुपयांची ही भेट मोदींनी आज अरुणाचल प्रदेशाला दिली. काँग्रेसने आपल्या 60 – 65 वर्षांच्या राजवटीच्या काळात कायम सीमावर्ती गावांकडे कायम दुर्लक्ष केले. सीमेवरच्या गावांचा विकास करण्याची गरज नाही. त्यामुळे सीमा संरक्षणाची गरजही संपते, अशी त्यांची धारणा होती. काँग्रेसची सरकारी सीमावर्ती गावांना भारताची “शेवटची गावे” म्हणत असत, पण मोदी सरकारने ते धोरण बदलले आणि सीमावर्ती गावांना भारताच्या “प्रथम गावांचा” दर्जा दिला. सीमा सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी दृष्टीने तिथे सर्व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोदी सरकारने प्राधान्य दिले असून सेला टनेलची निर्मिती हा त्यातला महत्त्वाचा घटक असल्याचे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

     हत्तीवर बसून काझीरंगाची सफर

    तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हत्तीवर बसून काझीरंगा अभयारण्याची सफर केली. तिथे त्यांनी गेंडे पाहिले. वनदुर्गा महिला वनाधिकाऱ्यांशी चर्चा केली. हत्तींना ऊस खाऊ घातला.

    Modi’s guarantee of 18000 crores to Arunachal Pradesh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!