विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत पंतप्रधान पंडित नेहरूंचे नाव घेतले, त्यामुळेराहुल गांधींच्या निकटवर्ती खासदाराने चिडून सावरकरांना वादात ओढले.Modi took Nehru’s name in Lok Sabha; MP close to Rahul Gandhi drags Savarkar into controversy!!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या भाषणात पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान इंदिरा गांधी भारतीय जनतेविषयी लाल किल्ल्यावरून नेमके काय बोलले होते, तेच ऐकवले. भारतीयांना कामाची सवय नाही. ते कमी बुद्धिमान आहेत. रशिया, जपान, युरोप अमेरिकेतले लोक भरपूर काम करून त्यांच्या देशाची प्रगती साधतात, पण भारतीयांना कामाची सवय नसल्यामुळे येथे प्रगती होत नाही, असा ठपका नेहरूंनी भारतीयांवर ठेवला होता. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोट ठेवले. इंदिरा गांधींनी देखील भारतीयांना आत्मविश्वास नसल्याचा ठपका ठेवला होता त्यावर देखील मोदींनी बोट ठेवले.
परंतु मोदींच्या या भाषणामुळे काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षांमध्ये खासदार चिडले. यापैकीच एक खासदार बहुजन समाज पार्टीचे दानिश अली होते. ते सध्या काँग्रेस खासदार राहुल गांधींचे निकटवर्ती मानले जातात. मोदींनी नेहरू आणि इंदिरा गांधींचे नाव घेतल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी सावरकरांना वादात ओढले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंवर टीका केली. पण पंडित नेहरू 9 वर्षे इंग्रजांच्या जेलमध्ये होते. मोदींचे राजकीय पूर्वज (सावरकर) तर इंग्रजांकडे माफी मागून जेलमधून सुटले. ते “माफीवीर” होते, पण मोदींसाठी ते “वीर” झाले, असे शरसंधान दानिश अली यांनी सोडले.
मोदींचे भाषण पूर्ण अहंकाराने भरलेले होते. त्यांना स्वतः शिवाय दुसरे काहीच दिसले नाही. त्यांना देशात अल्पसंख्यांकांवर होत असलेले अत्याचार दिसले नाहीत. मणिपूर मधल्या महिलांची दुःखे दिसली नाहीत. देशातली बेरोजगारी दिसली नाही. त्यांना फक्त निवडणुकीतले भाजपचे यश दिसले. या पलीकडे त्यांच्या भाषणात दुसरे काहीही नव्हते, असे टीकास्त्रही दानिश अली यांनी सोडले.
पंतप्रधान मोदींनी आपल्या संपूर्ण भाषणात सावरकरांचा कुठल्याही उल्लेख केलेला नसताना दानिश अली यांनी मात्र ओढून ताणून सावरकरांचा जुनाच मुद्दा समोर आणला. नेहरूंवर मोदींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सावरकरांना अस्थानी वादात ओढले.
Modi took Nehru’s name in Lok Sabha; MP close to Rahul Gandhi drags Savarkar into controversy!!
महत्वाच्या बातम्या
- ब्रिटिश संसदेत झाली बीबीसीच्या पक्षपातीपणाची पोलखोल, राममंदिराचे कव्हरेज एकतर्फी दाखवल्याचा आरोप
- हिंदूंना कुत्रा म्हणणाऱ्या मौलाना मुफ्ती सलमान अझहरीला अटक; घाटकोपर मध्ये समर्थकांचा दंगा, पोलिसांचा लाठीमार!!
- मुस्लीम धर्मगुरू मौलाना मुफ्ती सलमान अझरींना अटक!
- उत्तराखंड मंत्रिमंडळाने UCC मसुद्याच्या प्रस्तावाला दिली मंजुरी