वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे एका पाठोपाठ एक उत्तराखंडच्या राजकीय मोहिमेवर निघाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तराखंडची राजधानी डेहराडून मध्ये राज्यासाठीच्या 18 हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा शिलान्यास करण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडसाठी पायाभूत सुविधांकरिता एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा संकल्प बोलून दाखवला. Modi today, Rahul Gandhi on December 16 in Uttarakhand; Modi lays foundation stone of Rs 18,000 crore projects
संपूर्ण देशभरात येत्या 25 वर्षात 100 लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामे होणार आहेत. एक लाख कोटींची कामे उत्तराखंडमध्ये होत आहेत. केंद्र सरकारचा हा मोठा संकल्प आहे. त्याला आशीर्वाद द्या, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.
पुढील वर्षी 2022 च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये उत्तराखंडमध्ये निवडणुका अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेगा प्रोजेक्टच्या शिलान्यास समारंभाकडे बघण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज उत्तराखंडचा दौरा आटोपल्यानंतर येत्या 16 डिसेंबर रोजी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी हे उत्तराखंडच्या दौऱ्यावर येणार असून ते देखील डेहराडूनमध्ये मोठ्या जाहीर सभेला संबोधित करतील, असे काँग्रेसने जाहीर केले आहे. राहुल गांधी यांच्या उत्तराखंड दौऱ्याचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आदी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे दोन बडे नेते एकेका राज्याच्या मोहिमेवर निघाले आहेत. यापैकी उत्तराखंडच्या मोहीमेवर आज पंतप्रधान गेले आहेत, तर 16 डिसेंबर रोजी राहुल गांधी जाणार आहेत. बड्या प्रोजेक्ट शिलान्यास आणि उद्घाटने हे मोदींच्या कार्यक्रमांचे मुख्य भाग आहेत, तर महागाईपासून शेतकरी आंदोलनात पर्यंत विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरत राहणे हा राहुल गांधींचा मुख्य राजकीय अजेंडा आहे. येत्या काही दिवसात या दोन राजकीय अजेंडा यांची राष्ट्रीय पातळीवर टक्कर होताना बघायला मिळणार आहे.
Modi today, Rahul Gandhi on December 16 in Uttarakhand; Modi lays foundation stone of Rs 18,000 crore projects
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचार्यांसोबत समन्वय साधून परिवहनमंत्र्यांनी मार्ग काढावा – प्रवीण दरेकर
- ‘सामना’तून शिवसेनेचा ममता दीदींवर निशाणा, काँग्रेसला दूर ठेवून राजकारण म्हणजे सध्याच्या सरकारला बळ देण्यासारखंच!
- Omicron Variant : सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाचा खुलासा – कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा ओमिक्रॉन जास्त धोकादायक असल्याचा सध्या पुरावा नाही!
- आत्मनिर्भर भारतातून संरक्षणाचा बूस्टर डोस; अमेठीत बनणार ५ लाख ए के २०३ एसॉल्ट रायफली!!