• Download App
    मोदी हे भारताचे दंग श्याव फंग; अमेरिका - चीन संघर्षाचा भारताला फायदा; बिलिनिअर गुंतवणूकदार रे डॅलिओंची स्पष्टोक्ती Modi is Deng Xiaoping': India has highest growth potential among top nations, billionaire Ray Dalio says

    मोदी हे भारताचे दंग श्याव फंग; अमेरिका – चीन संघर्षाचा भारताला फायदा; बिलिनिअर गुंतवणूकदार रे डॅलिओंची स्पष्टोक्ती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जागतिक पटलावर प्रमाणात आणि नजीकच्या भविष्यात फार मोठे बदल होत आहेत. जग बहुध्रुवीय होत आहे. विद्यमान वर्ल्ड ऑर्डर बदलत आहे आणि अमेरिका – चीन यांच्यातला संघर्षाचा मोठा फायदा भारताला होणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे दंग श्याव फंग ठरले आहेत, अशी स्पष्टोक्ती बिलीनियर गुंतवणूकदार रे डॅलिओंनी केली आहे. Modi is Deng Xiaoping’: India has highest growth potential among top nations, billionaire Ray Dalio says

    जागतिक पटलांवरच्या बदलांसंदर्भात आणि भविष्यातील गुंतवणुकी संदर्भात रे डॅलिओ यांनी सटीक भाष्य केले. रे म्हणाले, की भारताची सध्याची वाटचाल ही 1984 च्या आसपासच्या चीन सारखी आहे. त्यावेळी चीनचे सर्वोच्च नेते दंग श्याव फंग यांनी चिनी अर्थव्यवस्था खुली केली. त्यामुळे चीनमध्ये प्रचंड गुंतवणूक आली. चीन टप्प्याटप्प्याने जगाचा उत्पादक देश बनला. आज भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी दंग श्याव फंग यांच्यासारखेच आर्थिक सुधारणाकार बनले आहेत. भारतातल्या आर्थिक सुधारणांचा वेग वाढवून त्यांनी त्याचे लाभ सर्वदूर पोहोचवले आहेत. भारताला जागतिक पटलावर आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये निर्णायक स्थानावर आणून ठेवले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात भारत जागतिक गुंतवणुकीचा सर्वात मोठा लाभार्थी ठरणार आहे.



    वर्तमान काळात आणि नजीकच्या भविष्यात अमेरिका आणि चीन यांच्यातल्या आर्थिक संघर्षात भारताला लाभ होणार आहे. कारण जागतिक पातळीवरचा युद्धाचा इतिहास असे सांगतो, की दोन युद्धमान राष्ट्रांपेक्षा तिसऱ्या तटस्थ राष्ट्रांना मोठा फायदा होतो. भारत आज तसाच लाभ उठविण्याच्या स्थितीत आलेला आहे, याकडे यांनी लक्ष वेधले.

    – दंग श्याव फंग यांची आर्थिक सुधारणा

    चीनमध्ये 1980 च्या दशकात दंग श्याव फंग हे माओ झेडाँग यांच्यानंतरचे सर्वात मोठे नेते होते. चीन त्यावेळी कम्युनिस्ट राजवटीच्या नियंत्रित अर्थव्यवस्थेचा देश होता. त्यामुळे तो आर्थिक कर्दमात रुतला होता. त्याचवेळी जागतिक पातळीवरून चीनवर आर्थिक दबाव वाढत होता. त्यामुळे दंग श्याव फंग यांनी विशिष्ट मर्यादेत चीनची अर्थव्यवस्था खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चीनच्या पूर्वेकडील भागात शांघायसारखे शहर विकसित झाले. तेथे मोठ्या प्रमाणावर स्पेशल इकॉनॉमिक झोन्स तयार केले. त्यातून चीनच्या अर्थव्यवस्थेला उत्पादनाच्या पातळीवर गती मिळाली. 1984 नंतरच्या 10 वर्षांमध्ये चीन युरोप आणि भारताला मागे टाकून पुढे गेला. आता तो अमेरिकेशी अर्थ युद्ध लढतो आहे. जागतिक पातळीवरची दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था हे चीनचे आता स्थान आहे. याची पाळेमुळे दंग श्याव फंग यांच्या आर्थिक सुधारणा धोरणात आहेत.

    रे डॅलिओ यांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता भारताच्या दृष्टीने दंग श्याव फंग यांच्या भूमिकेत आहेत. त्यांनी भारताच्या आर्थिक सुधारणा तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत आणि भारताच्या आर्थिक क्षमतांची संभावना वाढवली आहे. त्याचा दीर्घकालीन फायदा भारताला होणार आहे म्हणूनच त्यांनी मोदींची तुलना दंग श्याव फंग यांच्याशी केली आहे.

    Modi is Deng Xiaoping’: India has highest growth potential among top nations, billionaire Ray Dalio says

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी