• Download App
    मोदी परत येत आहेत, पण भाजपला किती जागा मिळतील? जाणून घ्या राजकीय चाणक्य 'पीके'चा अंदाजModi is coming back but how many seats will BJP get Know the prediction of politician Chanakya PK

    मोदी परत येत आहेत, पण भाजपला किती जागा मिळतील? जाणून घ्या राजकीय चाणक्य ‘पीके’चा अंदाज

    भाजपच्या रणनीतीमध्ये विरोधी पक्ष पूर्णपणे फसला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: भारतीय राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एनडीटीव्हीचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांना एक विशेष मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागेल हे येणारा काळच सांगेल. मात्र, एनडीएचे सरकार परतणार असल्याचे त्यांना वाटते. प्रशांत किशोर म्हणाले, “पीएम मोदी 4 जून रोजी 2019 प्रमाणेच किंवा किंचित चांगल्या आकड्यांसह सत्तेवर परत येतील असे दिसते.” Modi is coming back but how many seats will BJP get Know the prediction of politician Chanakya PK

    पीके म्हणाले की, पूर्व आणि दक्षिणमध्ये भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा या दोन्हींमध्ये वाढ होताना दिसत आहे. या भागातील जागा वाढल्याने दक्षिण-पूर्व भागात भाजपला 15-20 जागा मिळू शकतात. उत्तर-पश्चिममध्येही भाजपचे फारसे नुकसान झालेले दिसत नाही.

    पीके यांनी म्हटले की भलेही लोकांमध्ये भाजप सरकारविरोधात काहीशी निराशा किंवा नाराजगी असेल, मात्र व्यापक स्वरुपात मोदी सरकारला हटवण्यासाठीचा संताप दिसत नाही. भाजपला आव्हान देणाऱ्यांचा कुठेही आवाज नाही. जर 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीवर नजर टाकली तर, राजकीय विश्लेषकांनी भविष्यवाणी केली होती की, भाजपला 272 पेक्षा अधिक जागा मिळतील. यावेळीही भाजपच्या बाजूने भविष्यवाणी होत आहे. र भाजपाने आपले उद्दिष्ट 272 जागांवरून 370 जागांचे केले आहे. भाजपची रणनीती पाहता बहुतांश राजकीय विश्लेषक विजयाची भविष्यवाणी करत आहेत. भाजपच्या रणनीतीमध्ये विरोधी पक्ष पूर्णपणे फसला आहे.

    Modi is coming back but how many seats will BJP get Know the prediction of politician Chanakya PK

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!