• Download App
    Rahul Gandhi मोदी ट्रम्पला घाबरतात, राहुल गांधींचे 5 दावे; मोदींची कृतीतून उत्तरे!!

    मोदी ट्रम्पला घाबरतात, राहुल गांधींचे 5 दावे; मोदींची कृतीतून उत्तरे!!

    नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात, अशी 5 उदाहरणे देत राहुल गांधींनी 5 दावे केले. परंतु, त्या दाव्यांना मोदींनी शाब्दिक उत्तरे न देता कृतीतून उत्तरे कशी दिली?? हे लक्षात घ्यायला हवे.

    राहुल गांधींचा दावा

    – भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असे आश्वासन मोदींनी दिल्याचे ट्रम्प परस्पर जाहीर करतात मोदी त्यांना उत्तर देत नाहीत.

    मोदींचे कृतीतून उत्तर :

    – भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबविली नाही. रशियाकडून तेल खरेदी करताना भारत रशियन चलन रुबल बरोबर चिनी चलन युआन देखील वापरतो : रशियन उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांचे प्रत्युत्तर

    – सप्टेंबर 2025 भारताची रशियाकडून 25,597 कोटी रुपयांच्या तेलाची खरेदी.

    राहुल गांधींचा दावा :

    – ट्रम्पनी वारंवार खिल्ली उडवून सुद्धा मोदी त्यांना अभिनंदन असे मेसेज पाठवतात

    मोदींचे कृतीतून उत्तर :

    – ट्रम्पचा निमंत्रणावरून मोदी असीम मुनीर बरोबर जेवायला गेले नाहीत. ते कॅनडा दौऱ्यावरून परस्पर भारतात निघून आले. मोदींनी फक्त गाजा़ युद्ध थांबविल्याबद्दल ट्रम्पचे अभिनंदन केले.

    राहुल गांधींचा दावा

    – भारताच्या अर्थमंत्र्यांचा अमेरिका दौरा रद्द केला

    मोदींचे कृतीतून उत्तर

    – अमेरिकेशी व्यापार वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेसारखीच भारत आणि स्वतंत्र टीम नेमली. भारताकडून व्यापारमंत्री पियुष गोयल वाटाघाटी करतात. अर्थमंत्र्यांच्या दौऱ्याशी त्याचा काहीही संबंध नाही.

    राहुल गांधींचा दावा

    – शर्म अल शेखची मीटिंग मोदींनी टाळली

    मोदींचे कृतीतून उत्तर

    – शर्म अल शेख मध्ये गाजा़ शांतता करारावर सह्या झाल्या. पण त्यामध्ये इजराइल आणि पॅलेस्टीनचे अधिकृत प्रतिनिधी नव्हते. बाकीच्याच 22 देशांनी तिथे करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ट्रम्प यांनी मोदींना आयत्या वेळेला निमंत्रण दिले होते. पण मोदींनी स्वतःच्या ऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांना पाठविले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे निमंत्रण स्वतः स्वीकारण्यापेक्षा आपल्या तिसऱ्या फळीतल्या मंत्र्याला मोदींनी तिथे पाठविले. ट्रम्प यांनी कीर्ती वर्धन सिंह यांचे तिथे स्वागत केले.

    राहुल गांधींचा दावा

    – भारत पाकिस्तानचे युद्ध थांबविण्याचा दावा ट्रम्पनी वारंवार केला, पण मोदींनी उत्तर दिले नाही.

    मोदींचे कृतीतून उत्तर

    – भारत पाकिस्तानचे युद्ध थांबविण्याचा दावा करून ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारावर दावा ठोकला होता. पाकिस्तानने त्यासाठी त्यांची शिफारस केली, पण मोदींनी ट्रम्प यांच्या इच्छेनुसार त्यांची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली नाही. ट्रम्प यांची मध्यस्थी सुद्धा भारताने कधीही मान्य केली नाही. ट्रम्प वारंवार दावे करत राहिले, तरी भारताच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी त्यांचे सगळे दावे खोडून काढले. मोदींनी ट्रम्प यांच्या दाव्याला हिंग लावून सुद्धा विचारले नाही.

    Modi is afraid of Trump, 5 claims of Rahul Gandhi; Modi’s answers through actions!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai : मुंबई एसटी बँकेच्या मीटिंगमध्ये तुफान राडा; गुणरत्न सदावर्ते आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- वृद्धांना तरुणांना जंगलराजची कहाणी सांगायला लावा; नोकरीच्या बदल्यात जमीन घेणाऱ्यांपासून बिहारला वाचवायचे आहे

    Pakistan : पाकिस्तानचा काबुलवर बॉम्बहल्ला, अफगाणिस्तानचा ड्रोन हल्ला; दोन्ही देशांत 48 तास युद्धविराम, तालिबानचा दावा- पाकने विनंती केली