• Download App
    मोदी सरकारमध्ये 11 महिला मंत्री, 50 महिला खासदार, 100 पेक्षा अधिक महिला आमदार; राहुल गांधींना सुनावले खडे बोल Modi govt has 11 women ministers, 4 women Governors. BJP has +50 MPs,+100 MLAs. Moreover

    मोदी सरकारमध्ये ११ महिला मंत्री, ५० महिला खासदार, १०० पेक्षा अधिक महिला आमदार; राहुल गांधींना सुनावले खडे बोल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर असभ्य शेरेबाजी करणाऱ्या राहुल गांधींना भाजपने कठोर शब्दात सुनावले आहे. मोदी सरकारमध्ये 11 महिला मंत्री आहेत. भाजपच्या 50 हून अधिक महिला खासदार आहेत तसेच भाजपच्या 100 पेक्षा जास्त महिला आमदार देशभरात निवडून आल्या आहेत. महिलांच्या मुद्द्यांवरून महिलांच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करणारे “ही व्यक्ती” अज्ञानी आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांचे भाजप नेत्यांनी वाभाडे काढले आहेत. Modi govt has 11 women ministers, 4 women Governors. BJP has +50 MPs,+100 MLAs. Moreover

    राहुल गांधी यांनी महिला काँग्रेसच्या कार्यक्रमात भाजपवर टीका करताना महात्मा गांधी यांच्यावर असभ्य शब्दात शेरेबाजी केली. ते म्हणाले होते, की आपण महात्मा गांधींचे चित्र बघतो तेव्हा त्यांच्याभोवती दोन-तीन महिला असतात. तुम्ही मोहन भागवत यांच्याभोवती महिला कधी बघितल्यात का? त्यांची संघटना महिलांचे दमन करते. आपली काँग्रेस संघटना महिलांना प्लॅटफॉर्म देते. काँग्रेसने एका महिलेला पंतप्रधान करून दाखविले आहे. संघ आणि मोदींनी महिलांना पंतप्रधान केलेले नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

    त्यावर भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस विजया रहाटकर यांनी ट्विट करून राहुल गांधी यांना खडे बोल सुनावले आहेत. या ट्विटमध्ये त्या म्हणतात, की मोदी सरकारमध्ये 11 महिला मंत्री आहेत. 50 पेक्षा अधिक महिला भाजपच्या खासदार आहेत. 100 पेक्षा अधिक महिला भाजपच्या आमदार आहेत. ज्या व्यक्तीने महात्मा गांधीं विरोधात असभ्य शब्दात शेरेबाजी केली “त्या व्यक्तीला” ही वस्तुस्थिती माहिती नाही. भाजपचे सर्व धोरण नारीशक्तीभोवती केंद्रित आहे, याची आठवणही विजया रहाटकर यांनी राहुल गांधी यांना करून दिली आहे.

    भाजपचे मध्यप्रदेशमधील नेते राहुल गांधी यांच्या विरोधात उद्या पोलीस केस दाखल करणार आहेत. त्यांनी हिंदू देवी देवतांचा अपमान केला, असे त्यांचे म्हणणे आहे. संघ – भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले होते, की ते जातील तिथे लक्ष्मी आणि दुर्गा यांना मारत असतात, अशा शब्दात राहुल गांधी यांनी संघ आणि भाजपवर टीका केली होती. यावरूनच त्यांच्या विरोधात उद्या मध्य प्रदेशात पोलीस केस भाजपचे नेते दाखल करणार आहेत.

    Modi govt has 11 women ministers, 4 women Governors. BJP has +50 MPs,+100 MLAs. Moreover

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!