• Download App
    मिशन काबूल फतेह करण्यासाठी मोदी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; पाच दिवसात मदतीची याचना करणारे आले दोन हजार कॉल|%tiModi government's warlike efforts to conquer Mission Kabul; Two thousand calls in five days for help

    मिशन काबूल फतेह करण्यासाठी मोदी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; पाच दिवसात मदतीची याचना करणारे आले दोन हजार कॉल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भाजपचे सरकार अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. त्या अंतर्गत स्थापन केलेल्या अफगाण स्पेशल सेलला पाच दिवसांत दोन हजारांहून अधिक कॉल मदत मागण्यासाठी आले आहेत. तर सहा हजारांहून अधिक व्हॉट्सअॅप संदेशांना उत्तर देण्यात आले आहे.Modi government’s warlike efforts to conquer Mission Kabul; Two thousand calls in five days for help

    अफगाणिस्तानातून भारतीयांना बाहेर पडता यावे यासाठ परराष्ट्र मंत्रालयानं अफगाण स्पेशल सेल स्थापन केला आहे. त्यावर ५ दिवसात दोन हजारांहून अधिक कॉल आले आहेत. तर ६ हजारांहून अधिक व्हॉट्सअॅप संदेशांना उत्तर देण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की १२०० हून अधिक मेलला उत्तर देऊन अडचणीत अडकलेल्या लोकांना मदत केली जात आहे.



    परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सेल अफगाणिस्तानातून भारतात येण्यासाठी उत्सुक भारतीय आणि इतर गरजू नागरिकांना मदत करत आहे. यामध्ये व्हिसा, पासपोर्ट आणि इमिग्रेशनशी संबंधित सर्व माहितीही दिली जात आहे.

    काबूलमधूनच नाही तर अफगाणिस्तानच्या विविध भागातून कॉल येत आहेत. यात सुरक्षित वाटत नसलेल्या अफगाणांची संख्याही मोठी आहे. दरम्यान, रविवारी २५० पेक्षा जास्त प्रवासी ताजिकिस्तान आणि कतारची राजधानी दोहामार्गे काबूलहून भारतात पोहोचले.

    तर १६८ प्रवासी विशेष हवाई दलाच्या विमानांद्वारे गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचले आहेत. यापैकी १०७भारतीय नागरिक आहेत. तर २४अफगाण नागरिक आहेत. त्यात दोन अफगाणिस्तानचे संसद सदस्य नरेंद्र सिंह खालसा आणि अनारकली आहेत.

    Modi government’s warlike efforts to conquer Mission Kabul; Two thousand calls in five days for help

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी