केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली माहिती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकाही जवळ येत आहेत. दरम्यान, सत्तेतील मोदी सरकारने व्होट बँक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उज्ज्वला योजनेचा विस्तार करताना केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील ७५लाख कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्याच्या घोषणेला मंजुरी दिली आहे. Modi government will provide free LPG connection to 75 lakh people
उल्लेखनीय आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना दिलासा देण्यासाठी मे २०१६ मध्ये उज्ज्वला योजना सुरू केली होती. आता देशातील सरकारने या योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे गेल्या महिन्यात केंद्र सरकारने ७५ लाख नवीन कनेक्शन देण्याची घोषणा केली होती. आता त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.
याबाबत माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, ‘उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत देशात ९.६० कोटी एलपीजी सिलिंडरचे वितरण केले आहे. आता मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आणखी ७५ लाख मोफत LPG कनेक्शन दिले जातील, जेणेकरून आणखी गरीब आणि गरजू महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पुढील तीन वर्षांत ७५ लाख एलपीजी कनेक्शनसाठी १ हजार ६५० कोटी रुपये खर्च केले जातील. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम विपणन कंपन्यांना निधी देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
Modi government will provide free LPG connection to 75 lakh people
महत्वाच्या बातम्या
- ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दर 6.83 टक्क्यांवर; भाज्यांचे दर घसरल्याने घट, जुलैमध्ये होता 7.44%
- दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी ‘इंडिया’ची आज होणार बैठक; संयुक्त प्रचार, संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत चर्चा
- लिबियात वादळ, पुरामुळे 3 हजार जणांचा मृत्यू; 123 जवानांसह 10 हजार लोक बेपत्ता
- राजस्थानमध्ये काँग्रेसला घरचा आहेर! आमदाराने मुंडन करत मु्ख्यमंत्री गेहलोत यांना पत्राद्वारे सुनावले