विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने चक्क एका पाकिस्तानी सैनिकाला पद्म पुरस्कार प्रदान केला आहे. मात्र, त्यामागचे कारणही तितकेच महत्वाचे आहे.Modi government awarded Padma award to a Pakistani soldier!
भाजप सरकारने गेल्या काही वर्षांपासून तळागाळातल्या ज्यांच्या कामाबद्दल लोकांना जास्त माहिती नाही अशा नागरिकांचा पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहेत. याच प्रमाणे भारत सरकारने चक्क एका पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यालाही पद्म पुरस्कार दिला आहे. लेफ्टनंट कर्नल काजी सज्जाद असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
1971 मध्ये पाकिस्तानी लष्करात 20 वर्षाचे असताना ते भरती झाले होते. त्यांचाच भारतातल्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.भारत-पाक युद्धाच्या काही दिवसांपूर्वीच लष्करात भरती झाली होती.
त्यांची नियुक्ती पूर्व पाकिस्तानच्या (आताचा बांगलादेश) सियालकोट भागात झाली होती. त्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्यामार्फत करण्यात येणारा क्रूर अत्याचार त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे एक दिवस आपल्या लष्कराची महत्त्वाची कागदपत्रं आणि नकाशे बुटामध्ये लपवून ते भारतात पळून आले.
सीमेवर पकडल्यानंतर त्यांच्याकडे 20 रुपये आणि सैन्याची कागदपत्रं मिळाली. त्या वेळी त्यांना पाकिस्तानी गुप्तहेर समजून पकडण्यात आलं. चौकशीसाठी पठाणकोटला आणल्यानंतर सज्जाद यांनी पाकिस्तानी सैन्याची योजना भारतीय अधिकाऱ्यांना सांगितली.
भारतीय सैन्याने त्यानुसार कारवाई केली आणि सज्जाद यांनी दिलेली माहिती अगदीच खरी ठरली. यानंतर मग सज्जाद यांना दिल्लीला पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना कित्येक महिने एका सुरक्षित घरात ठेवण्यात आलं. त्यानंतर बांगलादेशला स्वतंत्र करण्यासाठी मुक्ती वाहिनीला छापामार युद्धाचं ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना बांगलादेशला पाठवण्यात आले.
सज्जाद यांच्या नावावर पाकिस्तानमध्ये डेथ वॉरंट जारी आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वी हे वॉरंट जारी करण्यात आलं होतं. सज्जाद सांगतात, की पाकिस्तानी सेना ही त्या काळी आपल्याच लोकांविरोधात क्रूरपणे वागत होती. तेव्हाची प्रत्येक घटना आपल्याला आजही लक्षात असल्याचं सज्जाद सांगतात.
तेव्हा जिन्नांचं पाकिस्तान हे कब्रस्तान झालं होतं. आम्हाला दुय्यम वागणूक दिली जात होती. ज्या लोकशाहीचं आम्हाला वचन देण्यात आलं होतं, ती लोकशाही आम्हाला कधीच मिळाली नाही. आम्ही कायमच वंचित राहिलो. सियालकोटमध्येही एलिट पॅरा ब्रिगेडमध्ये कार्यरत असूनही आम्हाला वेगवेगळं ठेवण्यात आले होते. या कारणांमुळेच आपण पाकिस्तान सोडल्याची माहिती सज्जाद यांनी दिली.
काजी सज्जाद यांच्या 71च्या युद्धामधल्या कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे. त्यांना बांगलादेशमधल्या बीर प्रोतिक या बांग्ला देशातील वीर चक्र पुरस्काराने आणि बांगलादेशचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेलं स्वाधीनता पदकही दिलं गेलं आहे.
Modi government awarded Padma award to a Pakistani soldier!
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार भाजप उभा करणार?
- आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ
- पक्षी निरीक्षण : रंकाळा तलाव पक्षी प्रेमींना खुणावतेय, विविध 43 प्रजातींची नोंद
- आता अमृता फडणवीस यांनीही नवाब मलिकांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- ४८ तासांत माफी मागा!
- सावरकर प्रेमींच्या संतापानंतर नाशिकच्या साहित्य संमेलन गीतात झाला बदल!!