विशेष प्रतिनिधी
कोलकता : उत्तर बंगालमधील रायगंज जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा प्रचार करताना अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने कोलकत्याला आणण्यात आले आहे. डिडायड्रेशनमुळे त्यांना त्रास झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.Mithun dada admitted in hospital
रायगंज येथे मिथुन चक्रवर्ती दुपारी एका रोड शोमध्ये सहभागी झाले होते. सात किलोमीटरच्या या रॅलीला खुल्या वाहनातून सुरुवात झाल्यानंतर साधारण एक किलोमीटर अंतर गेल्यावर त्यांच्या छातीत दुखायला लागले व श्वावस घेण्यासही त्रास होऊ लागला.
नंतर त्यांना त्यांच्या हेलिकॉप्टरमधून कोलकत्याला आणण्यात आले.प. बंगालमध्ये सर्व पिढ्यांतील प्रेक्षकांवर मिथुन चक्रवर्तीने गारूड घातलेले आहेच. त्यामुळे मिथून ज्यावेळी राजकारणात आला त्याचवेळी भाजपचे पारडे थोडे वरचढ झाल्याचे मानले जाते.
Mithun dada admitted in hospital