विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वाईनमध्ये अल्कोहोल नसते, असे म्हणणाऱ्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी वाईन पिऊन सरळ चालून दाखवावे, असे आव्हान भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी ठाकरे – पवार सरकार मधल्या मंत्र्यांना दिले आहे. Ministers of Maharashtra should walk straight after drinking wine; MP Sujay Vikhe Patil’s challenge !!
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री संदर्भातला निर्णय ठाकरे – पवार सरकारने घेतला आहे. तो वादग्रस्त ठरला आहे. त्यावर समाजाच्या सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. या संदर्भात सुजय विखे पाटील यांनी मंत्र्यांना आव्हान दिले आहे. वाईन म्हणजे दारू नव्हे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. तसेच अनेक मंत्र्यांनी वाईनमध्ये अल्कोहल नसल्याचा दावाही केला होता. याच पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी संबंधित मंत्र्यांना वाईन पिऊन सरळ चालवून दाखवा, असे आव्हान दिले आहे. एबीपी माझाशी ते बोलत होते.
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल – डिझेल वरचा कर कमी केला. अनेक राज्यांनी या निर्णयाचे स्वागत करून आपापल्या राज्यातील कर देखील कमी केले. परंतु, महाराष्ट्राने पेट्रोल डिझेलवरील कर कमी केला नाही. आर्थिक स्थिती खालावली असल्यामुळे त्यांनी कर कमी केला नसेल. पण सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची एवढी लगबग का? धडपड का?, असा खोचक सवालही सुजय विखे पाटलांनी केला.
महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांचा 35 वर्षातला प्रश्न केंद्रातील मोदी सरकारने 35 मिनिटांमध्ये सोडवला. त्या निर्णयाचा मी साक्षीदार आहे, असे सुजय विखे पाटील म्हणाले.
Ministers of Maharashtra should walk straight after drinking wine; MP Sujay Vikhe Patil’s challenge !!
महत्त्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी; बंडातात्यांच्या मठात पोलीस!!
- प्लॅटफ़ॉर्म तिकिट काढून रेल्वेत चढा; चेकरकडून रीतसर प्रवासाचे तिकीट घेण्याची प्रवाशांना संधी
- राजदूतांना मोदींनी दिले टार्गेट, निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
- पुण्यातील येरवड्यात स्लॅबसाठी तयार लोखंडी जाळ्यांचे छत कोसळून सात जणांचा मृत्यू