• Download App
    एमआयएमचा नेता म्हणतो जास्त मुलं झाली नाही तर मुस्लिम भारतावर राज्य कसे करणार?|MIM leader says how can Muslims rule India if they don't have more children?

    एमआयएमचा नेता म्हणतो जास्त मुलं झाली नाही तर मुस्लिम भारतावर राज्य कसे करणार?

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : जर मुस्लिमांना जास्त मुलं होणार नाहीत, तर मग आपला समाज भारतावर राज्य कसा करणार? आपली संख्या जास्त नसेल तर असदुद्दीन ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होतील, शौकत अली साहेब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कसे होतील, असे वक्तव्य एमआयएमच्या एका नेत्याने केले आहे.MIM leader says how can Muslims rule India if they don’t have more children?

    एमआयएम अलीगडचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते असदुद्दीन ओवेसी यांना पंतप्रधान बनवायचे असल्यास मुस्लिमांना आणखी मुले जन्माला घालावी लागतील, असे म्हणताना दिसत आहेत.



    गुफरान नूर म्हणतात की, दलित, मुस्लिमांना मुलं जन्माला घालण्यापासून रोखण्यासाठी धमकावले जात आहे. आम्ही का मुलं जन्माला घालू नयेत? हे आमच्या शरियतच्या विरोधात आह.दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नूर यांनी स्पष्टीकरण देत म्हणाले,

    जेवढा सहभाग आम्ही बलिदानात दिलाय, आमचा तेवढा सहभाग मुलं जन्माला घालण्यात नाही. ओवेसी साहेब पंतप्रधान व्हावेत, ते कसे होईल, अशी चर्चा सुरू होती, त्यात मी माझे वैयक्तिक मत व्यक्त केले. आणि त्यात मी काहीही चुकीचे बोललो नाही.

    MIM leader says how can Muslims rule India if they don’t have more children?

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही