वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सोशल मीडिया कंपनी Meta ने भारतात Meta Verified प्रोग्राम लाँच केला आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली. त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, ‘मेटा व्हेरिफाईड आता भारत, यूके आणि कॅनडामध्ये उपलब्ध आहे आणि लवकरच ब्राझीलमध्ये येत आहे.’Meta Launches Verified Program in India, Blue Tick Available on Facebook and Instagram for Rs 699
भारतासाठी, Meta ने iOS आणि Android डिव्हाइस वापरकर्त्यांसाठी 699 रुपयांची मासिक सदस्यता योजना ठेवली आहे. कंपनीने म्हटले आहे की, पुढील काही महिन्यांत वेब वापरकर्ते दरमहा 599 रुपये देऊन सबस्क्रिप्शन प्लॅन घेऊ शकतील. या सबस्क्रिप्शन प्लॅनद्वारे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ब्लू टिक उपलब्ध असेल.
आधीपासून व्हेरिफाइड खात्यावरील ब्लू टिक काढली जाणार नाही
मार्क झुकेरबर्गने सांगितले की, फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट ज्यांचे व्हेरिफाइड झाले आहे त्यांना ब्लू टिक सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावा लागणार नाही. आधीच व्हेरिफाइड केलेल्या युझर्सच्या ब्लू टिक्स काढल्या जाणार नाहीत.
चाचणीदरम्यान सकारात्मक परिणाम मिळाले
मेटाने ब्लॉग पोस्टद्वारे सांगितले की जगातील अनेक देशांमध्ये चाचणीदरम्यान सकारात्मक परिणाम दिसले आहेत, त्यानंतर ही सेवा भारतात सुरू केली जात आहे.
व्हेरिफाइड युझर्ससाठी मिळतील हे फीचर्स
ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनप्रमाणे मेटा व्हेरिफाईड यूजर्सना काही खास फीचर्सदेखील मिळतील. झुकरबर्ग म्हणाले, ‘मेटा व्हेरिफाईड म्हणजे आमची सेवा, सत्यता आणि सुरक्षा वैशिष्ट्ये वाढवण्यासाठी आहे.’
कंपनीचा दावा आहे की, कंटेंट व्हिजिबिलिटी आणि मासिक सदस्यता घेणाऱ्या युझर्सचा रीच वाढेल. यासोबतच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर स्टोरीज आणि रील्ससाठी खास स्टिकर्स उपलब्ध असतील.
तुम्हाला अतिरिक्त संरक्षण मिळेल, म्हणजेच तुमचा बनावट आयडी कोणीही तयार करू शकणार नाही. क्रिएटर्सना समर्थन देण्यासाठी फेसबुकवर दर महिन्याला 100 स्टार मिळतील.
अटी पूर्ण केल्यानंतरच अकाउंटची पडताळणी केली जाईल
कंपनीने सांगितले की, ज्या वापरकर्त्यांना Meta Verified सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यायचा आहे त्यांचे वय किमान 18 वर्षे असावे. यासह, खात्यावर किमान अॅक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. तसेच, वापरकर्त्यांना सरकारी आयडी अपलोड करावा लागेल, त्यानुसार खात्याचे नाव आणि फोटो जुळला पाहिजे.
Meta Launches Verified Program in India, Blue Tick Available on Facebook and Instagram for Rs 699
महत्वाच्या बातम्या
- राघव चढ्ढा : “नको सरकारी बंगला” ते “हवा मोठाच बंगला”; आम आदमी पार्टीच्या नेत्यांचा राजकीय प्रवास!!
- Wrestler Protest Row : ‘’ब्रिजभूषण सिंह विरोधात खोटी तक्रार दाखल’’ अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांचा मोठा दावा!
- मोबाईल गेम जिहाद मधून धर्मांतराचे मुंब्रा कनेक्शन बाहेर येताच जितेंद्र आव्हाडांचा संताप; दिली मुंब्रा बंदची धमकी!!
- मीरा भाईंदर निर्घृण हत्याकांड आणि सिलेक्टिव्ह राजकीय मानसिकता!!