• Download App
    मध्य प्रदेशात मेडीकलच्या विद्यार्थ्यांना गिरवावे लागणार आरएसएसच्या नेत्यांबरोबर राष्ट्रीय नेत्यांच्या विचारांचे धडे|Medical students in Madhya Pradesh will have to take lessons from national leaders along with RSS leaders

    मध्य प्रदेशात मेडीकलच्या विद्यार्थ्यांना गिरवावे लागणार आरएसएसच्या नेत्यांबरोबर राष्ट्रीय नेत्यांच्या विचारांचे धडे

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ: मध्य प्रदेशातील मेडीकलच्या विद्यार्थ्यांना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) संस्थापक डॉ.के.बी. हेडगेवार, भारतीय जनसंघाचे प्रमुख दीन दयाल उपाध्याय यांच्यासोबतच स्वामी विवेकानंद, डॉ भीमराव आंबेडकर आणि महर्षी चरका यांच्या विचारांचे धडे गिरवावे लागणार आहेत.Medical students in Madhya Pradesh will have to take lessons from national leaders along with RSS leaders

    मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. हेडगेवार, स्वामी विवेकानंद, डॉ भीमराव आंबेडकर आणि आयुवेर्दामध्ये प्रमुख योगदान असणाऱ्या महर्षी चरक यांच्या शिकवणुकीचे धडे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहे. नव्याने प्रवेश घेतलेल्या एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्सच्या अध्यायांमध्ये या अभ्यासक्रमाचा समावेश असेल.



    केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 मध्ये नागपुरात हिंदुत्वाच्या विचारसरणीवर आधारित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. दीनदयाल उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे प्रमुख नेते होते. सारंग म्हणाले, मूल्याधारित शिक्षणासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

    स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या महापुरुषांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी. स्वातंत्र्यासाठी लढा देणाºयांच्या चरित्राचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागेल.राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. शिक्षण मंत्री हे या विषयातील तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम ठरविण्याचा त्यांना अधिकार नाही.

    कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण यादव म्हणाले, फक्त हेडगेवार आणि दीनदयाल जीच का? भाजप सरकारने मुलांना सावरकर आणि गोडसेबद्दलही शिकवावे. त्यामुळे सावरकरांनी किती वेळा इंग्रजांकडे माफी मागितली आणि गोडसेने महात्मा गांधींना कसे मारले याची माहिती विद्यार्थ्यांना होईल.

    Medical students in Madhya Pradesh will have to take lessons from national leaders along with RSS leaders

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे