• Download App
    आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा|Medical Exams will start on time

    आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १० जूनपासून सुरू होणाऱ्या ऑफलाईन परीक्षांना स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने आता या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे.Medical Exams will start on time

    १० जूनपासून ही परीक्षा होणार असून, सुमारे ४० हजार विद्यार्थी राज्यात आहेत; मात्र कोरोना संसर्गात परीक्षा घेऊ नये. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना लस द्यावी, अशी मागणी सामाजिक संस्थांकडून याचिकेद्वारे केली होती.



    नागपूर खंडपीठाचे न्या. अविनाश घारोटे यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. याचिकादार विद्यार्थ्यांनी सेवाभावी क्षेत्रात करिअर करत आहेत. ते भविष्यातील डॉक्टर आहेत. मग असे घाबरून ते नागरिकांना सेवा कशी देणार, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

    विद्यापीठाकडून याचिकेला विरोध करण्यात आला. यापूर्वी ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या आणि आताही विद्यार्थ्यांना याबाबत पर्याय दिला होता. असा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने याचिकेवर पुढील सुनावणी २० जूनला निश्चित केली आहे. सुमारे ४० हजार विद्यार्थी १७० परीक्षा केंद्र आहे

    सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे भारतासारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या देशात तातडीने शक्य नाही; मात्र लस हा एकच मुद्दा यामध्ये नसून नागरिकांनी स्वतः हून जबाबदारी घेऊन वागायला हवे, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

    Medical Exams will start on time

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती