विशेष प्रतिनिधी
कल्याण : कदाचित २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही. नरेंद्र मोदींंना कांदे, बटाटेचे भाव कमी करण्यासाठी प्रधानमंत्री करण्यात आलेले नाही, असे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी म्हटले आहे.Maybe by 2024, Pakistan-occupied Kashmir will in India, Modi as PM not to reduce onion and potato prices, claims Kapil Patil
राम कापसे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना कपिल पाटील म्हणाले की, एकीकडे 750 रुपये किलो दराने मटण घेतो, 500 -600 रुपयांचा पिझ्झा आपण खातो. मात्र दुसरीकडे 10 रुपयांचा कांदा, 40 रुपयांचे टोमॅटो आपल्याला महाग वाटतात. महागाईचे समर्थन कोणीही करणार नाही.
मात्र कांदे, बटाटेचे भाव कमी करण्यासाठी त्यांना प्रधानमंत्री करण्यात आलेले नसून आपण त्यामागील कारणे समजून घेतली तर त्यांना दोष देणार नाही. सीएए कायदा असो, 370 कलम असो की 35 ए सारखा सगळ्यात घातक कायदा असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यामुळेच हे कायदे रद्द होऊ शकले आणि यासारखे धाडसी निर्णय घेण्यासाठी नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पाहिजे.
काश्मीरमधील 370 आणि 35 ए कलम हटवल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही.नरसिंह राव यांनी केलेल्या कायद्याचा दाखला दिला होता. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी पार्लमेंटचे संयुक्त अधिवेशन घेत काश्मीरबाबत कायदा पारित करून घेतला.
ज्यामध्ये काश्मीर ही देशाची फार मोठी समस्या आहे. पाकव्याप्त काश्मीर त्यांच्या ताब्यात असून हा भाग भारताने घेतल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असे पी.व्ही.नरसिंह राव यांनी नमूद केले. त्याचाच संदर्भ जोडून हे तुमचेच काम आहे, तुमच्याकडून झाले नाही म्हणून आम्ही करतो असे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिल्याचेही कपिल पाटील यांनी आठवण करुन दिली.
Maybe by 2024, Pakistan-occupied Kashmir will in India, Modi as PM not to reduce onion and potato prices, claims Kapil Patil
महत्त्वाच्या बातम्या
- वार-पलटवार : आमची वायनरी असेल तर त्यांनी ती ताब्यात घ्यावी, भाजप नेत्यांची मुलं केळी विकतात का? संजय राऊतांचे किरीट सोमय्यांना आव्हान
- विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले होते अजमेर सामूहिक बलात्काराचे प्रकरण
- मोठी बातमी : संजय राऊतांच्या परिवाराची वाईन व्यावसायिकासोबत भागीदारी, राऊतांच्या दोन्ही मुली संचालक, किरीट सोमय्यांचा आरोप