वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संपूर्ण भारत वर्षावर कालीमातेने आपल्या आशीर्वादाची कायमच पाखर घातली आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालीमाते विषयी आपली भक्ती प्रकट केली आहे. May the blessings of Goddess Kali be with you all year round
मूळची तमिळ पण सध्या कॅ नडास्थित असलेली चित्रपट निर्माती लीना मणिमेकलाई हिने केलेल्या वादग्रस्त ट्विटर पोस्टवरुन सोशल मीडियावर वाद रंगला आहे. ‘काली’ या डॉक्युमेंट्री फिल्मचे पोस्टर लीना हिने ट्विटरवर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये हिंदू देवी-देवतांचा अपमान केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लीनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. देवी कालीवरील पोस्टरवरून सुरू असलेल्या या वादादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले आहे. माँ काली हे संपूर्ण भारताच्या भक्तीचे केंद्र असून कालीमातेचे आशीर्वाद कायम देशावर राहोत, असे मोदी म्हणाले.
स्वामी आत्मस्थानंदजींच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, आपल्या देशात संन्याशांची मोठी परंपरा आहे. त्यागाचे अनेक प्रकार आहेत. संन्यासाचा अर्थ म्हणजे स्वतःसाठी न जगता समुहासाठी जगणे, समुहासाठी कार्य करणे. पुढे मोदी असेही म्हणाले, स्वामी विवेकानंदांनी महान संत परंपरेला आधुनिक स्वरूपात साकारले आहे. स्वामी आत्मस्थानानंदजींनीही संन्याशाचे हे रूप वास्तव्य करून साकारले. आपल्या संतांनी आपल्याला दाखवून दिले आहे की जेव्हा आपले विचार व्यापक असतात तेव्हा आपण आपल्या प्रयत्नात कधीही एकटे पडत नाही.
– रामकृष्ण परमहंसांची आठवण
स्वामी रामकृष्ण परमहंस हे असे संत होते, जे माँ कालीशी प्रत्यक्ष बोलले होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य माँ कालीच्या चरणी समर्पित केले होते. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की हे सर्व जग, हे परिवर्तनशील आणि अस्थिर, सर्व काही आईच्या चैतन्याने व्याप्त आहे. बंगालच्या काली पूजेत ही जाणीव दिसते. माँ कालीचे असीम आशीर्वाद सदैव भारतावर आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
– महुआ मोईत्रांचे वादग्रस्त वक्तव्य
पंतप्रधान मोदींच्या काली माँ संदर्भातील वक्तव्यानंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रभारी अमित मालविया यांनी ट्विट करत ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी माँ कालीबद्दल भक्तिभावाने बोलले. ती केवळ बंगालसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी श्रद्धेचे केंद्र आहे. दुसरीकडे, टीएमसी खासदार महुआ मोईत्रांनी माँ कालीचा अपमान केला आणि त्या खासदारावर कारवाई करण्याऐवजी ममता बॅनर्जी माँ कालीबद्दलच्या निंदनीय विधानाचा बचाव करतात.
May the blessings of Goddess Kali be with you all year round
महत्वाच्या बातम्या
- हिंदू मानसिकतेत बदल : अजमेर दर्ग्यातली गर्दी 90% ओसरली; खादिमच्या जिहादी वक्तव्याचा परिणाम!!
- शिंदे फडणवीस सरकार : भुजबळ, आदित्य ठाकरेनंतर आता जयंत पाटलांना दणका!!; घाईगर्दीत मंजूर केलेल्या कामांना स्थगिती
- गोव्यात भाजप करतोय काँग्रेसचा “शिंदे पॅटर्न”; दिगंबर कामत ठरताहेत “एकनाथ शिंदे”!!
- विकास आराखड्यानुसार वारकऱ्यासांठी स्वच्छ, सुविधायुक्त पंढरपूर साकारणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- शिवसेनेसारखेच काँग्रेसमध्येही मोठे बंड अपेक्षित; गिरीश महाजनांचा दावा!!