विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यांच्या पोलिसी यंत्रणा आणि नार्कोटिक कंट्रोल ब्युरो यांच्या मोठ्या कारवायांमधून हजारो किलोंचे ड्रग्स वेगवेगळ्या बंदर किनाऱ्यावर पकडले गेले. यातला मुख्य सूत्रधार जाफर सादिक आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या जाळ्यात अडकला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने जाफर सादिकलाला अटक केली असून त्याच्याच तोंडून बॉलीवूड मधले ड्रग्सचे “महाकनेक्शन” समोर आले आहे इतकेच नाही तर इथून पुढच्या काळात आणखी मोठ्या कारवाया करून प्रचंड मोठा ट्रक्स ड्रग्सचा महा घोटाळा लवकरच बाहेर येईल असा गोपी स्फोट नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी आज केला. Mastermind Jafar Sadiq in NCB’s arrested
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ऑपरेशन ब्रँचने भारत – ऑस्ट्रेलिया – न्यूझीलंड ड्रग्स ट्रॅफिकिंग नेटवर्कमधील मुख्य सूत्रधार जाफर सादिकला पकडले आहे. जाफर स्वतःला तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष DMK च्या एनआरआय विंगचा उपप्रमुख म्हणवतो.
जाफर सादिकला अटक केल्यानंतर तपासात त्याच्या तोंडून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी अनेक “रहस्ये” उघडकीस आणली आहेत. ड्रग्सच्या तस्करीतून त्याने प्रचंड कमाई करून ती सिनेमा, बांधकाम क्षेत्र, हॉस्पिटॅलिटी क्षेत्र यात गुंतवली. किंबहुना हे सगळे उद्योग तो मूळच्या ड्रग्स तस्करीतल्या कमाईसाठी “कव्हर व्यवसाय” म्हणून वापरत होता. त्याला तामिळनाडूतल्या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षातल्या नेत्यांसह बॉलीवूड मधल्या अनेक बड्या कनेक्शन्सनी सातत्याने मदत केली. आता त्याची सगळी पाळेमुळे खणून काढण्यात येतील, असे ज्ञानेश्वर सिंह यांनी स्पष्ट केले.
जाफर सादिकचे बॉलीवूड मधले “बडे कनेक्शन” तसेच त्याचे इतर साथीदार यांचाही ठाव ठिकाणा लागला असून त्याचे ऑस्ट्रेलियातही एक मॉड्यूल आहे, ज्याची चौकशी सुरू आहे, लवकरच आम्ही त्याचाही भंडाफोड करू, असे ज्ञानेश्वर सिंह यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही महिन्यांपासून भारतातल्या वेगवेगळ्या बंदर किनाऱ्यांवरून हजारो किलोचे ड्रग्स पकडले गेले आहे. त्या सगळ्याचे कुठे ना कुठेतरी जाफर सादिक याच्याशी कनेक्शन आहे. आता तोच पकडला गेल्यामुळे ड्रग्स तस्करीतला सगळ्यात मोठा मासा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गळ्याला लागला आहे. त्यातून अनेक प्रतिष्ठितांचे बुरखे फाटण्याची शक्यता आहे.
Mastermind Jafar Sadiq in NCB’s arrested
महत्वाच्या बातम्या
- फारुख अब्दुल्ला म्हणाले- घराणेशाही असती तर मुख्यमंत्री असताना निवडणूक हरलो नसतो; 370चा आळवला सूर
- शासन आपल्या दारी अंतर्गत सुमारे साडेचार कोटी लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ
- मोहम्मद शमी क्रिकेटच्या मैदानातून निवडणुकीच्या आखाड्यात??; पश्चिम बंगाल मधून कमळावर लढण्याची शक्यता!!
- नेहेल्यावर देहेल्या ऐवजी दुर्री – तिर्रीच!!; भाजपच्या 195 च्या बदल्यात काँग्रेसचे फक्त 39 उमेदवार जाहीर; राहुल वायनाडमधूनच!!