• Download App
    ओडिशात मुसळधार पावसाचे थैमान, हिराकूड धरणाचे दरवाजे उघडले Massive flood in Odisha

    ओडिशात मुसळधार पावसाचे थैमान, हिराकूड धरणाचे दरवाजे उघडले

    विशेष प्रतिनिधी

    भुवनेश्वर – ओडिशात मुसळधार पावसामुळे हिराकूड धरणाचे २८ दरवाजे उघडले असून महानदीची पातळी वेगाने वाढत चालली आहे. चोवीस जिल्ह्यात पूरस्थिती असून आतापर्यंत साडेसात हजाराहून अधिक घरांची पडझड झाली आहे. गेल्या चोवीस तासात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. Massive flood in Odisha



    काल सायंकाळी सहापर्यंत आखुआपदा येथे वैतरणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर मथनी येथे जलका नदीची पातळी देखील वाढली आहे. तसेच वरच्या भागात मुसळधार पावसामुळे हिराकूड धरणाचे २८ दरवाजे उघडले आहेत. सलग पावसामुळे २४ जिल्ह्यांना फटका बसला असून ७ हजार ५४० घरांची पडझड झाली आहे.

    बंगालच्या उपसागरात कमी दाबामुळे निर्माण झालेला प्रभाव कमी झाला असला तरी सलग तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. काल राज्यातील १२ जिल्ह्यात २३ ब्लॉकमध्ये ५० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

    Massive flood in Odisha

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज