• Download App
    Dwarka दिल्लीतील द्वारका येथील एका अपार्टमेंटमध्ये भीषण अग्नितांडव

    Dwarka : दिल्लीतील द्वारका येथील एका अपार्टमेंटमध्ये भीषण अग्नितांडव

    वडील आणि दोन मुलांनी जीव वाचवण्यासाठी उडी मारली मात्र तिघांचाही मृत्यू.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – दिल्लीतील द्वारका Dwarka येथे आज (मंगळवार) सकाळी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. येथील एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. या अपार्टमेंटचे नाव ‘सबाद अपार्टमेंट’ असून ती द्वारका सेक्टर-१३ मधील एक बहुमजली इमारत आहे. ज्यामध्ये अचानक मोठी आग (fire) लागली.

    आग लागताच परिसरात एकच खळबळ उडाली. ही आग अपार्टमेंटच्या सर्वात वरच्या फ्लॅटमध्ये लागल्याचे समोर आले आहे. या दरम्यान, जीव वाचवण्यासाठी दोन मुलांनी आणि त्यांच्या वडिलांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. ज्यामुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

    अग्निशमन विभागाला तत्काळ या आगीची माहिती देण्यात आली. अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. ज्यामध्ये अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावरून प्रचंड धूर आणि भीषण ज्वाळा बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.

    अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच 8 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला, या दरम्यान दोन मुले आणि त्यांच्या वडिलांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. ज्यामुळे तिघांचाही मृत्यू झाला. द्वारका येथील ‘सबाद अपार्टमेंट’ हे एमआरव्ही शाळेजवळ आहे. अशा घटनेने स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    ज्या इमारतीत आग लागली त्या इमारतीत राहणाऱ्या सर्व लोकांनी आरोप केला की, जेव्हा अपार्टमेंट समितीच्या लोकांना याची माहिती देण्यात आली तेव्हा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणात पूर्ण निष्काळजीपणा दाखवण्यात आला.

    Massive fire breaks out in an apartment in Dwarka at Delhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    विजयाताई रहाटकर : पुण्यातल्या महिला जनसुनावणीत 76 केसेस मध्ये त्वरित निर्णय; जनसुनावणीतून पीडित महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित!!

    Himachal Pradesh : हिमाचलमध्ये 16 जागी ढगफुटी; पूर-भूस्खलनात 51 मृत्यू, 22 बेपत्ता; वाराणसीत गंगेत बुडाली 20 मंदिरे

    PM Modi : घानामध्ये PM मोदींना 21 तोफांची सलामी; राष्ट्रपती महामा यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले