• Download App
    बुरखाधारी दहशतवाद्याने सीआरपीएफ कॅम्पवर बॉम्ब फेकून काढला पळ; व्हिडिओ व्हायरल!! । Masked terrorist throws bomb at CRPF camp, escapes; Video goes viral !!

    बुरखाधारी दहशतवाद्याने सीआरपीएफ कॅम्पवर बॉम्ब फेकून काढला पळ; व्हिडिओ व्हायरल!!

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सोपोर शहरात सीआरपीएफ कॅम्पवर 29 मार्च रोजी संध्याकाळी बुरखा घातलेल्या दहशतवाद्याने पेट्रोल बॉम्ब फेकला. सोशल मीडियावर या बाॅम्ब हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बुरखा घातलेला एक दहशतवादी सीआरपीएफच्या कॅम्पवर बॉम्ब फेकताना दिसत आहे. Masked terrorist throws bomb at CRPF camp, escapes; Video goes viral !!



    हा दहशतवादी बुरखा घालून रस्त्यावर आला. त्याने आपल्या बॅगेतून बॉम्ब काढला आणि तो सीआरपीएफ कॅम्पवर फेकला. बॉम्ब फेकल्यानंतर लगेच दहशतवाद्याने घटनास्थळावरून पळ काढला. जेव्हा दहशतवाद्याने कॅम्पवर बॉम्ब फेकला तेव्हा काही दुचाकीही तिथून जाताना दिसल्या. दहशतवाद्यांनी पेट्रोल बॉम्ब टाकल्याने तेथे छोटी आग लागली. स्थानिकांनी लगेच पाणी टाकून ती विझवली. मात्र या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. सुरक्षा दल दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

    दोन दहशतवादी ठार

    29 मार्च रोजी उशिरा श्रीनगरच्या रैनावरी भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.

    Masked terrorist throws bomb at CRPF camp, escapes; Video goes viral !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी