निवडणुकीसाठी अवघे तीन-चार महिने उरले आहेत. या काळात.. असंही म्हणाले आहेत..
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल भाजप खासदार मनोज तिवारी ( Manoj Tiwaris ) यांनी आतिशी यांचे अभिनंदन केले. राज निवास येथे शपथविधी कार्यक्रमातही ते उपस्थित होते. मनोज तिवारी म्हणाले, “दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी आतिशी यांचे अभिनंदन करतो. मला दिल्लीबद्दल काही चिंता आहेत ज्या मी त्यांना सांगेन. मी त्यांना पत्रही लिहित आहे.
मनोज तिवारी म्हणाले, अरविंद केजरीवाल साडेनऊ वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. दिल्लीतील परिस्थिती आधीच लोकांना दिसत आहे, रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नदी घाण आहे आणि हवा प्रदुषित आहे. आम्ही त्यांना विनंती करत आहोत की, तुम्ही या दबावात येवू नका की, तुम्ही तुमचे काम केले तर अरविंद केजरीवाल यांचे नाव खराब होईल. निवडणुकीसाठी अवघे तीन-चार महिने उरले आहेत. या काळात आम्ही तुम्हाला तुमच्या कामात पूर्ण सहकार्य करू.
- Atishi Marlena : आतिशी मार्लेना यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाच आमदारही झाले मंत्री
आतिशींच्या आधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित या दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री होत्या. आतिशी या दिल्लीचे सर्वात तरुण मुख्यमंत्री देखील आहेत. आतिशी यांच्यासह पाच कॅबिनेट मंत्री गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. राजनिवास येथे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी सर्वांना शपथ दिली.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी आज (21 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. कैलाश गेहलोत म्हणाले की, आमचा संकल्प एकच आहे, अरविंद केजरीवाल यांना परत आणण्याचा. आम्ही सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.” गोपाल राय म्हणाले, “ही संपूर्ण टीम अरविंद केजरीवाल यांची टीम आहे.
Manoj Tiwaris first reaction after Atishi took oath as Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
- Nitesh Rane : वड्याचे तेल वांग्यावर; राष्ट्रवादीकडून नवाब मलिक प्रकरणाची आगपाखड नितेश राणेंवर!!
- ameshbhai oza : आपले कार्य उपकार नाही, तर साधना : रमेशभाई ओझा; वनवासी कल्याण आश्रमाचे हरियाणात राष्ट्रीय कार्यकर्ता संमेलनाचे उद्घाटन
- Hezbollah : पेजर-वॉकी-टॉकी स्फोटानंतर, हिजबुल्लाच्या गडावर आणखी एक हल्ला