लोकांना लस देण्याऐवजी काँग्रेसशासित राज्यांनी लसीकरणाबाबत शंका घेऊन दुसरी लाट पसरण्यास हातभार लावला, असे प्रत्युत्तर आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना लिहिलेल्या पत्रावर दिले आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते असलेल्या मनमोहन सिंग यांच्या पत्राचा मसुदा तयार करणाऱ्यानी त्यांच्या प्रतिमेस तडा जाईल असाच मजकूर लिहिला आहे.Manmohan Singhji, first tell Congress member to stop questioning the vaccine. Harsh Vardhan Short reply
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकांना लस देण्याऐवजी काँग्रेसशासित राज्यांनी लसीकरणाबाबत शंका घेऊन दुसरी लाट पसरण्यास हातभार लावला, असे प्रत्युत्तर आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना लिहिलेल्या पत्रावर दिले आहे.
वरिष्ठ काँग्रेस नेते असलेल्या मनमोहन सिंग यांच्या पत्राचा मसुदा तयार करणाऱ्यानी त्यांच्या प्रतिमेस तडा जाईल असाच मजकूर लिहिला आहे.डॉ. हर्ष वर्धन यांना लसीकरणाचे महत्त्व मनमोहन सिंग यांना कळते हे मान्य केले
तरी काही काँग्रेस नेत्यांनी सार्वजनिक पातळीवर बेजबाबदार वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण, आघाडीच्या कर्मचाºयांचे लसीकरण काँग्रेस शासित राज्यात कमी प्रमाणात झाले.
मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात कोविड- १९ पेचप्रसंग हाताळण्यासाठी पाच उपायांचा उल्लेख केला होता. त्यात, लसीकरण वाढवण्यावर भर देणे व औषधांचा पुरवठा वाढवणे यांचा समावेश होता.
यावर वर्धन यांनी म्हटले आहे, की काँग्रेस पक्षात जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तींनी तसेच काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांनी तुम्ही जे म्हटले आहे ते कधीच म्हटलेले नाही. किंबहुना त्यांना तुमचा हा सल्ला मान्य नव्हता.
कसोटीच्या काळात वैज्ञानिक, लस उत्पादक, आरोग्य कर्मचारी यांनी नेटाने काम केले होते, त्याची दखल काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली नाही. उलट काँग्रेस नेत्यांनी लशींच्या परिणामकारकतेबाबत वावड्या उठवल्या. त्यामुळे लोकांनी लसीकरणापासून आखडता हात घेतला.