• Download App
    Manisha Kayande Responds Jain Monk Pigeon Controversy जैन मुनींच्या इशाऱ्याल मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर-

    Manisha Kayande : जैन मुनींच्या इशाऱ्याल मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर- ज्यांना कबुतरे आवडतात, त्यांनी ती घरी पाळावीत; सार्वजनिक ठिकाणी त्रास नको!

    Manisha Kayande

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Manisha Kayande मुंबईच्या दादरच्या कबुतरखान्यावरून वाद चांगलाच चिघळला आहे. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी या प्रकरणी सरकारला आव्हान दिले आहे. धर्माच्या विरोधात गेल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच, भाजप आमदार चित्रा वाघ आणि शिंदे गटाच्या शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा एकेरी उल्लेख केला.Manisha Kayande

    यावर आमदार मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ज्यांना कबुतरे आवडतात, त्यांनी ती घरी पाळावीत, सार्वजनिक ठिकाणी त्यांचा त्रास नको, असे त्या म्हणाल्या. या देशात पोलिस आणि न्यायव्यवस्था आहे की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.Manisha Kayande

    मनीषा कायंदे म्हणाल्या की, खरेतर चार दिवसाआधी मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले होते की या प्रकरणात जैन गुरु नव्हते. पण आता तेच धर्मगुरू या प्रकरणी आंदोलन करणार असल्याचे म्हणतात. दादरमधील कबुतरखाना हा माझा वैयक्तिक प्रश्न नाही, तर मुंबईत दोन कोटी लोक राहतात, त्यांचा हा विषय आहे.Manisha Kayande



    धर्मगुरू मार्गदर्शक असतात, ते आमचा एकेरी उल्लेख करतात. आम्ही विधान परिषदेवर आहोत, आम्ही कायदे मंडळामध्ये आहोत. आमच्यावर असे बोलणे बरोबर नाही. ज्यांना कबुतरे आवडतात त्यांनी घरी पाळावे. सार्वजनिक ठिकाणी याचा त्रास नको, असेही मनिषा कायंदे म्हणाल्या.

    कबुतरखान्यावर येताना चाकू-सुरे, हत्यारे काढता. या देशांमध्ये पोलिस आणि न्यायव्यवस्था आहे का नाही? असा प्रश्न मनिषा कायंदे यांनी केला. आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्था आहे. नागपंचमीला नागांना दूध पाजण्याची परंपरा होती, ती बंद केली. आता मशिदीवरचे अनधिकृत भोंगे बंद केले जात आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई व्हायला हवी, असे मनिषा कायंदे म्हणाल्या.

    जैन मुनींकडून आव्हानाची भाषा

    दादरमधील कबुतरखाना बंद करण्यास जैन समाजाचा तीव्र विरोध आहे. अशातच जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी थेट सरकारलाच आव्हान देण्याची भाषा सुरू केली. कबुतरखान्याला विरोध करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना देखील जैन मुनींनी काही प्रश्न विचारलेत. तसेच कबुतर खान्यासंदर्भात सरकारने अपेक्षित भूमिका घेतली नाही तर कबुतरखान्यातच सामूहिक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जैन मुनींनी दिला.

    Manisha Kayande Responds Jain Monk Pigeon Controversy

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : निवडणूक आयोगाने राहुल गांधींकडून मत चोरीचे पुरावे मागितले; नोटिसीमध्ये म्हटले- महिलेच्या दोनदा मतदानाचा दावा चुकीचा

    “मागच्या” रांगेतून संजय राऊत “पुढे” आले; पोलिसांच्या बस मध्ये राहुल गांधींच्या शेजारी बसले!!

    खासदारांच्या 30 जणांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी येण्याची निवडणूक आयोगाची परवानगी; पण विरोधकांच्या 300 खासदारांना आयोगात करायची होती घुसखोरी!!