अर्जावर ४ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचे आदेश
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कथित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात दिलेल्या अंतरिम जामीनाबाबत कोणतेही निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. Manish Sisodia is dealt a big blow by Supreme Courts order Refusal to hear the bail application
सिसोदिया यांच्या खटल्याला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा आणि नियमित जामीन अर्जावर पुढील महिन्यात ४ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मोठा झटका बसला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि एस.व्ही.एन. भाटी यांच्या खंडपीठाने सिसोदिया यांच्या खटल्याची सुनावणी करताना त्यांच्या पत्नीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगत त्यांच्या अंतरिम जामिनावर कोणताही आदेश देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याची पुढील सुनावणी ४ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
सिसोदिया यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सिसोदिया यांच्या पत्नीच्या आरोग्याच्या स्थितीशी संबंधित वैद्यकीय अहवालाचा हवाला देताना सांगितले की, सिसोदिया यांना त्यांच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात यावा. कारण त्या खूप आजारी आहेत. हा एक “मानवी” आणि “वास्तविक” मुद्दा आहे. त्यांची पत्नी गेल्या 23 वर्षांपासून सतत आजारी आहे. यावर टिप्पणी करताना खंडपीठाने सांगितले की, आम्ही नियमित जामिनावर जेव्हा सुनावणी करू, तेव्हा या विषयावर बोलू.
Manish Sisodia is dealt a big blow by Supreme Courts order Refusal to hear the bail application
महत्वाच्या बातम्या
- डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक – २०२३ लोकसभेत सादर; जाणून घ्या सविस्तर माहिती
- दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, आता ‘आप’ला राज्यसभेकडून आशा, या दोन पक्षांनी वाढवले टेंशन
- दिल्ली अध्यादेश विधेयक लोकसभेत मंजूर; अमित शाहांचा विरोधी आघाडीला टोला, म्हणाले…
- महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार; शिंदे – फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय