• Download App
    मणिशंकर अय्यर यांचा तोल पुन्हा गेला; म्हणाले, भारताचा झालाय भित्रा ससा झालाय!!; संरक्षणावर खर्च कमी करण्याचा "सल्ला " |Mani Shankar Iyer lost his balance again; Said, India has become a cowardly rabbit !!; "Advice" to reduce defense spending

    मणिशंकर अय्यर यांचा तोल पुन्हा गेला; म्हणाले, भारताचा झालाय भित्रा ससा झालाय!!; संरक्षणावर खर्च कमी करण्याचा “सल्ला “

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेसचे वादग्रस्त नेते मणिशंकर अय्यर यांची जीप पुन्हा सैलावली आहे. त्यांचा पुन्हा तोल गेला आहे. भारताचा भित्रा ससा झाला आहे. चीन आणि पाकिस्तानची भीती घालून सरकार संरक्षणावरचा खर्च वाढत आहे आणि अमेरिकेच्या कच्छपी लागले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.Mani Shankar Iyer lost his balance again; Said, India has become a cowardly rabbit !!; “Advice” to reduce defense spending

    भारत-रशिया मैत्री या विषयावर ते आज बोलत होते. भारताच्या परराष्ट्र धोरणावर त्यांनी टीका केली. त्यावेळी भारताला त्यांनी भित्र्या सशाची उपमा दिली. केंद्रातले मोदी सरकार चीन आणि पाकिस्तान यांची भीती दाखवून संरक्षणावरचा खर्च वाढवते आहे. तो खर्च वाढवण्याऐवजी शिक्षण, आरोग्य मूलभूत सुविधा यांच्यावरचा खर्च वाढवा त्यामुळे देशातील गरिबी दूर होईल, असा शहाजोग सल्ला मणिशंकर अय्यर यांनी दिला आहे.



    चीन आणि पाकिस्तान हे देश काही प्रत्येक वेळी तुमच्यावर हल्ला करायला टपलेले नाहीत. पण तुम्ही असा आव आणत आहात की ते दोन्ही देश तुमच्यावर कोणत्याही क्षणी हल्ला करतील आणि म्हणून तुम्ही सैन्यावर चा खर्च वाढवत चालला आहात. भारताला तुम्ही भित्र्या सशासारखे बनवून ठेवले आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्या तथाकथित भीतीने तुम्ही अमेरिकेच्या कच्छपी लागला आहात, असा आरोप त्यांनी मोदी सरकारवर करून घेतला.

    पण त्यामुळे मणिशंकर अय्यर यांनी मोदी सरकारवर टीका करताना एक प्रकारे चीन आणि पाकिस्तान यांची तळी उचलली आहे. त्यांच्या वक्तव्यातून खरे म्हणजे परस्परविरोध समोर आला आहे. एकीकडे भारताला भित्रा ससा म्हणताना ते संरक्षणावरचा खर्च कमी करायला सांगत आहेत. याच्यातच हा परस्पर विरोध दडला आहे.

    चीन आणि पाकिस्तान सारखा भारतावर हल्ला करत नाहीत असे सांगून त्यांनी एक प्रकारे कधीमधी ते दोन्ही देश भारतावर हल्ला करतात, असेच सूचित केले आहे. फक्त मोदी सरकारवर फैरी झाडण्यातसाठी त्यांनी ही विनोद विसंगत विधाने केली आहेत.

    हेच ते मणिशंकर अय्यर आहेत ज्यांना मोगलांचे शासन धर्मनिरपेक्ष वाटत होते. मध्यंतरी त्यांनी विविध राजवटींची तुलना करताना मोगलांचे शासन हे धर्मनिरपेक्ष होते. त्यांनी जर इस्लाम धर्म वाढवायचे ठरवले असते तर देशात 80 टक्के हिंदू राहिले नसते, असा खळबळजनक दावा केला होता. आज त्यांनी भारताला भित्रा ससा असे संबोधून नवीन वाद उत्पन्न केला आहे.

    Mani Shankar Iyer lost his balance again; Said, India has become a cowardly rabbit !!; “Advice” to reduce defense spending

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य