विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. फळांचा राजा आंब्याची चव यंदा खवय्यांना लवकर चाखायला मिळणार आहे. यावर्षी चा कोकणच्या हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली.Mango has come to Navi Mumbai; Good news
कोकणातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावातील वाळकेवाडी येथील शेतकरी अरविंद वाळके यांनी हा आंबा आणला आहे. या हंगामातील पाहिले २५ डझन आंबे आज बाजार समितीमध्ये दाखल झाले असून
या आंब्याची व्यापाऱ्यांकडून पूजा करत विक्रीसाठी ठेवण्यात आले. या आंब्याच्या एक डझनला चार ते पाच हजार रुपयांचा भाव मिळालाय. या महिन्यात त्याच्या शेतातून ५० पेट्या आंबा मार्केट मध्ये येणार आहे.
- आंबा नवी मुंबईत आला हो; खवय्यांसाठी खुशखबर
- हंगामातील पहिला आंबा बाजार समितीमध्ये दाखल
- कोकणातील अरविंद वाळके यांनी हा आंबा आणला
- २५ डझन आंबे आज बाजार समितीमध्ये दाखल
- एक डझनला चार ते पाच हजार रुपये भाव
- या महिन्यात आणखी ५० पेट्या आंबा येणार