• Download App
    Mandatory PNG Shift: LPG Supply to Stop for Households with Pipeline Access सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय

    Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय

    Mandatory PNG Shift

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : Mandatory PNG Shift पाइप्ड नॅचरल गॅसची (पीएनजी) जोडणी घेतलेली घरे तसेच पीएनजी कनेक्शन न घेतलेल्या घरांचा तीन महिन्यांनंतर एलपीजी सिलिंडर पुरवठा बंद केला जाणार आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यावर वाढणाऱ्या ताणादरम्यान केंद्र सरकारने हा आदेश जारी केला. पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले की, पाइपलाइनद्वारे पीएनजीचा सतत पुरवठा होतो.Mandatory PNG Shift

    त्यामुळे रिफिल बुक करण्याची गरज भासत नाही. तांत्रिक कारणांमुळे एखाद्या घरापर्यंत पीएनजी कनेक्शन देणे शक्य नसेल तर अधिकृत एजन्सी एनओसी (नाहरकत प्रमाणपत्र) देऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये एलपीजी पुरवठा बंद होणार नाही. एजन्सीला याची नोंद ठेवावी लागेल. घरापर्यंत पीएनजी लाइन पोहोचल्यानंतर एनओसी परत घेतली जाईल. हाउसिंग सोसायटी आणि संबंधित संस्थांना तीन कामकाजाच्या दिवसांत परवानगी द्यावी लागेल. गेल्या २५ दिवसांत २.५ लाख नवीन पीएनजी कनेक्शन देण्यात आले असून २.२० लाख लोकांनी एलपीजीवरून पीएनजीकडे स्थलांतर केले आहे.Mandatory PNG Shift



    गरजेच्या केवळ ५०% पीएनजी आपण तयार करतो, उर्वरित आयात

    देशात डिसेंबर २०२५ पर्यंत १.६२ कोटी पीएनजी कनेक्शन होते. सरकार २०३४ पर्यंत ही संख्या १२.६ कोटींपर्यंत नेत आहे.

    सध्या दररोज पीएनजीचा वापर १९५ दशलक्ष मेट्रिक स्टँडर्ड क्युबिक मीटर आहे.

    गरजेच्या ५०% पीएनजी देशातच ओएनजीसी आणि रिलायन्ससारख्या कंपन्या कृष्णा-गोदावरी बेसिन, मुंबई हाय आणि आसाममधून काढत आहेत. उर्वरित ५०% गॅस कतार, अमेरिका आणि यूएईमधून आयात करावा लागतो.

    आयात केलेला गॅस एलएनजी स्वरूपात येतो, त्याचे पीएनजीमध्ये रूपांतर करून घरांपर्यंत पोहोचवले जाते. पीएनजी २०-३०% पर्यंत स्वस्त पडते. यात गॅस वाया जात नाही.

    इंडिगो म्हणाली, जेट इंधन महाग, विमानभाडे वाढू शकते

    देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने म्हटले आहे की, युद्धामुळे जेट इंधनाचे दर ४ आठवड्यांत दुप्पट झाले आहेत. याचा परिणाम म्हणून विमान भाडे वाढण्याची शक्यता आहे.

    बाजार वधारला : सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स १२०५ (१.६३%) अंकांनी वधारून ७५२७३ वर बंद झाला. निफ्टीमध्ये ३९४ अंकांची वाढ झाली.
    एलपीजीचा सरासरी दैनंदिन वापर ९० हजार मेट्रिक टन आहे. ४०% गॅस देशात रिलायन्स, आयओसी, बीपीसीएल इत्यादी कंपन्या कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करून बनवतात. ६०% कतार, यूएई व सौदी अरेबियातून येतो.

    सरकार म्हणाले, पेट्रोल-डिझेल पुरेसे आहे, अफवा पसरवू नका

    मंत्रालयाची संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, देशात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. अफवा पसरवू नका आणि भीतीपोटी जास्त तेल खरेदी करणे टाळा.

    त्याचप्रमाणे सिलिंडर बुकिंगची टाइमलाइन बदलल्याच्या बातम्याही चुकीच्या आहेत. शहरांमध्ये ही मुदत २५ दिवस तर ग्रामीण भागात ४५ दिवस निश्चित आहे.

    Mandatory PNG Shift: LPG Supply to Stop for Households with Pipeline Access

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sabarimala : शबरीमाला व्यवस्थापनाने म्हटले- अयप्पा मंदिर रेस्टॉरंट नाही; देव ब्रह्मचारी, महिला का येऊ इच्छिता?

    नाशिक मधल्या कॉर्पोरेट जिहादची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल चौकशी आणि तपासासाठी विशेष समिती स्थापन!!

    Sai Keerthana : यूकेमध्ये भारतीय वंशाच्या स्पीच अँड लँग्वेज थेरपिस्ट बडतर्फ; इंग्रजी समजू न शकल्याने नोकरी गेली