विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजकारणात सक्रिय प्रवेश करत ममता बॅनर्जींनी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये सामिल करून घेतले आहे .त्या दिल्लीत पंतप्रधान मोदींनाही भेटल्या मात्र सोनिया गांधीना त्या भेटल्या नाहीत .आता चालू महिन्याच्या अखेरीस दिदी मुंबईचा दौरा करणार आहेत. त्यावेळी त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्या भेट घेणार आहेत. MAMTA BANERJEE: Congress leader’s wicket – PM Modi’s visit to Delhi Mamata Banerjee will now meet Sharad Pawar-Uddhav Thackeray in Mumbai!
ममतांच्या तृणमूल कॉंग्रेसने इतर राज्यांतही विस्तारण्याचा संकल्प केला आहे. त्यातून त्या पक्षात इतर राज्यांतील नेत्यांना प्रवेश दिला जात आहे. अशात दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या ममता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटल्या देखील नाहीत यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भेट घेतल्यानंतर ममतांना पत्रकारांनी गाठले. नेहमीप्रमाणे यावेळीही सोनियांना भेटणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर त्या उत्तरल्या, यावेळी मी केवळ मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती. प्रत्येक वेळी सोनियांची भेट का घेऊ? ती काही घटनात्मक जबाबदारी नाही. ममतांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
MAMTA BANERJEE : Congress leader’s wicket – PM Modi’s visit to Delhi Mamata Banerjee will now meet Sharad Pawar-Uddhav Thackeray in Mumbai!
महत्त्वाच्या बातम्या