वृत्तसंस्था
पाटणा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपवर तोंडी तोफा डागत असताना प्रत्यक्षात काँग्रेस फोडताना दिसत आहेत. त्याच वेळी त्यांच्या तोंडी सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्याची भाषा देखील आहे. त्यालाच काटशह म्हणून सोनिया गांधी यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याशी संपर्क साधला आहे. सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा अशी सूचना लालूप्रसाद यांनी सोनिया गांधी यांना केली आहे. Mamata Katshah; Sonia Gandhi should take initiative for unity of opposition; Lalu Prasad’s suggestion
काल सोनिया गांधी यांनी काल लालूप्रसाद यादव यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेची माहिती लालूप्रसाद यादव यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, की काँग्रेस राष्ट्रीय पातळीवरचा मोठा पक्ष आहे. संपूर्ण देशभर भाजपला पर्याय निर्माण करायचा असेल तर काँग्रेसची ताकद मोठी आहे. ती वापरून सर्व विरोधकांनी एकत्र आले पाहिजे. सोनिया गांधींनी मला फोन करून माझ्या तब्येतीविषयी आस्थेने चौकशी केली. त्यावेळी मी त्यांना सर्व विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी सूचना केली आहे. यातून काँग्रेस सर्व विरोधकांचे देशपातळीवर ऐक्य करून नेतृत्व देखील करू शकेल, असे लालूप्रसाद यादव म्हणाले.
ममता बॅनर्जी या आक्रमकपणे सर्व देशभर संचार करण्याच्या दृष्टीने राजकीय पावले टाकत आहेत. त्या उद्यापासून चार दिवस गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. असे असताना सोनिया गांधी आणि लालूप्रसाद यादव यांच्यातली ही बातचीत एक प्रकारे ममता बॅनर्जी यांच्या आक्रमकतेलाच वेसण घालण्याचा प्रकार असल्याचे मानले जात आहे. लालूप्रसाद यादव यांनी बिहार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भक्त चरण दास यांच्यावर टीका केली असली तरी देखील सोनिया गांधी यांनी स्वतः फोन करून लालूप्रसाद यांच्याशी बातचीत केल्याने या नेत्यांनी एकमेकांचे राजकीय महत्त्व ओळखले असे स्पष्ट होत आहे.
सोनिया गांधी यांना लालूप्रसाद यादव यांच्या रूपाने एका महत्त्वाच्या प्रादेशिक नेत्याचा केंद्रीय राजकारणासाठी पाठिंबा मिळताना दिसत आहे. तो काँग्रेसच्या आजच्या राजकीय संकट काळात अतिशय महत्त्वाचा आहे. येत्या नजीकच्या काळात सोनिया गांधी या आणखी काही प्रादेशिक नेत्यांची संपर्क साधू शकतात असे काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले आहे.
Mamata Katshah; Sonia Gandhi should take initiative for unity of opposition; Lalu Prasad’s suggestion
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी काँग्रेसला विजयी करा – नितीन बानगुडे पाटील
- AGAIN INDIA VS PAK : भारत-पाक सामन्यातील विक्रमांचा पाकला विसर ! हरभजनची धडाकेबाज ‘बोलिंग’ आणि मोहम्मद आमिर गपगार ! फिक्सर को सिक्सर-दोघांमध्ये तुफान ट्विटर वॉर….
- पेट्रोल-डिझेल कंपन्यांना दर ठरविण्याचा अधिकार काँग्रेस राजवटीत दिला; वारंवार इंधनाची दरवाढ
- अमृता फडणवीस यांचे दिवाळी निमित्ताने खास गाणे; सोशल मीडियावर गाण्याच्या ओळी पोस्ट शेअर