वृत्तसंस्था
पणजी : आठवडाभरापूर्वीच मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्यात आज शरद पवार यांनाच धक्का दिला आहे.Mamata hits Sharad Pawar; Churchill Alemao, the only NCP MLA in Goa, has joined Trinamool Congress
गोव्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून फोडून तृणमूल काँग्रेस मध्ये सामील करून घेतले आहे.चर्चिल आलेमाव यांनी विधानसभेचे विद्यमान सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे पत्र दिले
असून त्यामध्ये राष्ट्रवादी विधिमंडळ काँग्रेस भंग करून तिचे विलीनीकरण तृणमूल काँग्रेस मध्ये केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपल्याला इथून पुढे तृणमूल काँग्रेसचा आमदार म्हणून विधानसभेत स्वतंत्र जागा मिळावी, अशी मागणी चर्चिल आलेमाव यांनी केली आहे.
एकीकडे ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट घेऊन सिल्वर उपचार पोर्चमध्ये पत्रकारांशी बोलताना संयुक्त पुरोगामी आघाडीचे अर्थात यूपीएससी राजकीय अस्तित्व पुसून टाकले. शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत अशी स्तुतिसुमने उधळली,
पण आठवडाभरानंतर ममता बॅनर्जी यांनी पवारांनाच त्यांचा आमदार कडून गोव्यात राजकीय धक्का दिला आहे. तृणमूल काँग्रेस गोव्यामध्ये मते फोडायला आलेली नाही तर भाजप विरोधकांची सर्व मते गोळा करायला आली आहे असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
Mamata hits Sharad Pawar; Churchill Alemao, the only NCP MLA in Goa, has joined Trinamool Congress
महत्त्वाच्या बातम्या
- काशी विश्वनाथ कॉरिडाॅरचे उद्घाटन झाले; “हिंदू की हिंदुत्ववादी” शाब्दिक खेळ करत काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल!!
- ओमिक्रॉनमुळे ब्रिटनमध्ये जगातील पहिला मृत्यू, पंतप्रधान जॉन्सन म्हणाले – आम्ही संसर्गाच्या वादळी लाटेचा सामना करत आहोत
- WATCH : लस हवी, सिरींज घेऊन या; शिरूरमध्ये अजब प्रकार शिरूरचे नागरिक लसीकरण केंद्रात चक्रावले
- मोठी बातमी : भारताकडून SMART क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, समुद्रात वाढणार देशाची ताकद