पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत:ला भाजपाविरोधातील एकमेव चेहरा मानत आहेत. मात्र, ममतांचा भाजपाविरोध बेगडी असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार मालिनी भट्टाचार्य यांनी केला आहे. ममतांमुळे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे. Mamata caused RSS growth in West Bengal, accuses Marxist leader Malini Bhattacharya of defeating Mamata 32 years ago
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत:ला भाजपाविरोधातील एकमेव चेहरा मानत आहेत. मात्र, ममतांचा भाजपाविरोध बेगडी असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार मालिनी भट्टाचार्य यांनी केला आहे. ममतांमुळे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भट्टाचार्य यांनी १९८९ मध्ये कॉँग्रेसच्या उमेदवार असलेल्या ममता बॅनर्जी यांना जाधवपूर मतदारसंघात पराभव केला होता. नामवंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिध्द असलेल्या भट्टाचार्य म्हणाल्या, ममता बॅनर्जी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी कडवा मुकाबला करताना दिसत आहेत. मात्र, त्यांचे आरएसएसबरोबरचे संबंधही लपून नाहीत. भाजपाचा पश्चिम बंगालमधील उदय हा ममतांविरोधातील नकारात्मक भावनेमुळे झाला आहे.
भट्टाचार्य म्हणाल्या, काही अतिरेकी विचारांचे मित्र म्हणतात की ममता या पश्चिम बंगालमधील भाजपाविरोधाचा चेहरा आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत जायला हवे. परंतु, चेहरा आणि वस्तुस्थिती यांच्यामध्ये फरक असतो हे लक्षात घ्यायला हवे. ममतांनी आपला स्वतंत्र पक्ष काढला असला तरी त्यांचे आरएसएसशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये १९९९ मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या या वस्तूस्थितीकडे मी जातही नाही.
परंतु, आताही त्यांचे आरएसएसशी निकटचे संबंध लपून राहिलेले नाहीत. डाव्या पक्षांना नेस्तनाबूत करताना आणि राज्यातील लोकशाही संस्थांना मोडीत काढताना त्यांना आरएसएसचे सहकार्य मिळाले होते. पश्चिम बंगालमध्ये धार्मिक ध्रुवीकरण कधीही नव्हते. परंतु, ममता बॅनर्जी यांनी ही गौरवशाली परंपरा मोडीत काढली. धार्मिक आधारावर मते मागितली. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधून डाव्या आघाडीला सत्तेतून पायउतार केले. त्यासाठी आरएसएशी सक्रीय साथ मिळाली होती.
Mamata caused RSS growth in West Bengal, accuses Marxist leader Malini Bhattacharya of defeating Mamata 32 years ago
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील उद्योजकाचे प्रयत्न आणि पंतप्रधान मोदींची साथ, सिंगापूरहून साडेतीन हजार व्हेंटिलेटर करणार एअर लिफ्ट
- देशातील ३४ टक्के रेमडेसिवीर महाराष्ट्रासाठी, पुरवठ्याबाबत आरोप अनाठायी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट
- सचिन तेंडुलकरच कोरोनामुक्त झालेल्यांना आवाहन ; प्लाझ्मा डोनेट करा!
- कोरोना विरोधातील मॅच जिंकूया : हरभजन सिंग ; पुण्यात भाजपतर्फे फिरत्या कोरोना चाचणी व्हॅनचे उदघाटन
- हेळसांड अन् हलगर्जीपणा : ‘पीएमकेअर’मधून जानेवारीमध्येच निधी दिला असतानाही महाराष्ट्रातील ऑक्सिजनचे दहाही प्रकल्प कागदांवरच