विशेष प्रतिनिधी
कोलकाता: पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या महत्त्वाच्या अशा भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर, सर्वांच्या नजरा आज सकाळी आठ वाजेपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे लागले होते.Mamata Banerjee won the Bhawanipur by-election by 58,000 votes
ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.21 राउंडच्या मोजणीनंतर ममता यांना 84,709 मते मिळाली. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल सरकारला पोटनिवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान किंवा नंतर विजयाचा उत्सव किंवा कोणतीही मिरवणूक काढण्यास मनाई केली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने ममता सरकारला पत्र लिहून हे निर्देश दिले आहेत. यासोबतच आयोगाने निवडणुकीनंतर हिंसाचार होणार नाही यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
Mamata Banerjee won the Bhawanipur by-election by 58,000 votes
महत्त्वाच्या बातम्या
- राज्याचे मुख्यमंत्री म्हणे अशोक चव्हाण ; विनायक राऊत चक्क उद्धव ठाकरे यांनाच विसरले
- ममता बॅनर्जींनी भवानीपूरच्या विजयाचे श्रेय दिले बिगर बंगाली मतदारांना!!… पण का??
- कायदा आणि सुव्यवस्थेच्या बैठकीत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे काय काम? सीएम चन्नींसमोर नवे संकट
- नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर कोल्हापूर मधील रस्ते दुरुस्तीचे काम सुरू, पालकमंत्री सतेज पाटील यांची घोषणा