जाणून घ्या, काय सांगितलं आहे कारण?
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या I.N.D.I.A. आघाडीची पुढील बैठक ६ डिसेंबरला होणार आहे. याबाबत प्रश्न विचारला असता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी बैठकीबाबतची माहिती नसल्याचे म्हटले. Mamata Banerjee will not go to the meeting of the I.N.D.I.A. alliance
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीबाबत त्या म्हणाल्या, “मला याबाबत माहिती नाही आणि उत्तर बंगालमध्ये माझे काही कार्यक्रम नियोजित आहेत. मला याबाबत माहिती असती तर मी या बैठकीला उपस्थित राहिले असते. उत्तर बंगालमधील कार्यक्रमास गेली नसते मात्र आता मी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर जात आहे.”
न्यूज एजन्सी एएनआयनुसार, टीएमसी सुप्रिमो म्हणाले, “मला माहीत नाही. माझ्याकडे माहिती आलेली नाही. म्हणूनच मी कार्यक्रम निश्चत केला. आमचा कार्यक्रम उत्तर बंगालमध्ये आहे. आमचा दिवसभराचा कार्यक्रम आहे. जर मला माहिती असते, तर आम्ही कोणताही कार्यक्रम निश्चित केला नसता आणि नक्कीच गेले असते.”
Mamata Banerjee will not go to the meeting of the I.N.D.I.A. alliance
महत्वाच्या बातम्या
- छत्तीसगडमधील निकालापूर्वी भूपेश बघेल यांनी मोदींना लिहिले पत्र, केली मोठी मागणी!
- राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील मतमोजणीला सुरुवात
- मंत्रिमंडळ बैठकीत झाले 8 महत्त्वाचे निर्णय; अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने करणार मदत
- व्हॉट्सॲपने ऑक्टोबरमध्ये भारतात 75 लाखांहून अधिक बनावट खात्यांवर घातली बंदी