• Download App
    Mamata Banerjee took up the language movement ममता बॅनर्जींनी उचलले भाषा आंदोलनाचे शस्त्र;

    ममता बॅनर्जींनी उचलले भाषा आंदोलनाचे शस्त्र; पण त्यातून रोहिंग्या आणि बांगलादेशींना चिकटवले भारताचे नागरिकत्व!!

    Mamata Banerjee

    नाशिक : ममता बॅनर्जींनी उचलले भाषा आंदोलनाचे शस्त्र; पण त्यातून रोहिंग्या आणि बांगलादेशींना चिकटवले भारताचे नागरिकत्व!!, असे पश्चिम बंगाल मधल्या राजकीय खेळीतून समोर आले. बिहार पाठोपाठ पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक आयोगाचे मतदारांचे परीक्षण सुरू होणार आहे त्याला विरोध करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाषा आंदोलनाचे शस्त्र उपसले. त्यासाठी त्यांनी रवींद्रनाथ टागोरांची जन्मभूमी बीरभूमची भूमी निवडली. बीरभूम ते कलकत्ता असे आंदोलन करायची घोषणा केली. पण त्याचवेळी त्यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींना बंगाली नागरिक अर्थात भारतीय नागरिक अशी संज्ञा देऊन त्या मोकळ्या झाल्या.Mamata Banerjee took up the language movement

    आपल्या भाषणाच्या ओघात ममता बॅनर्जी म्हणाल्या, माझा कुठलाही भाषेला विरोध नाही सगळ्या भाषा आपल्याच आहेत आणि त्या प्रेमाच्या आहेत. पश्चिम बंगाल मध्ये 1 कोटी 50 लाख स्थलांतरित कामगार काम करतात तर 22 लाख स्थलांतरित कामगार पश्चिम बंगाल मधून बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन काम करतात. त्यांना मी भाषेच्या मुद्द्यावरून कधी राज्याबाहेर हाकलले नाही. इथून पुढेही त्यांना मी हाकलून देणार नाही.



    ममता बॅनर्जी यांनी अतिशय चतुराईने पश्चिम बंगालमध्ये एक कोटी 50 लाख स्थलांतरित कामगार काम करत असल्याचा गौप्यस्फोट केला. त्याचवेळी 22 लाख स्थलांतरित कामगार पश्चिम बंगाल मधून बाहेर जाऊन इतर राज्यांमध्ये काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

    – 1 कोटी 50 लाख स्थलांतरित कामगार की घुसखोर?

    पश्चिम बंगालची लोकसंख्या 10 कोटी 30 लाख असताना त्यामध्ये जवळपास सव्वा कोटी स्थलांतरित कामगार कुठून आले??, याचा हिशेब मात्र ममता बॅनर्जी यांनी दिला नाही. पश्चिम बंगाल औद्योगिक दृष्ट्या प्रगत नसताना त्या राज्याने तब्बल 1 कोटी 50 लाख स्थलांतरित कामगारांना कुठल्या उद्योगांमध्ये सामावून घेतले?, याचा खुलासा देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला नाही. त्याचबरोबर पश्चिम बंगाल मधून स्थलांतरित 22 लाख कामगार इतरत्र नेमके कुठे गेले??, याविषयी देखील त्यांनी चकार शब्द काढला नाही.

    पश्चिम बंगाल भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने देशातले चौथे सगळ्यात मोठे राज्य आहे. पाकिस्तानची निर्मिती झाली त्यावेळी म्हणजे 1948 मध्ये बंगालची देखील फाळणी झाली त्यावेळेचा पूर्व बंगाल पूर्व पाकिस्तान बनला आणि त्यावर्षी पश्चिम बंगालमध्ये 17 % मुस्लिम उरले. 2025 ची जनगणना अजून झालेली नाही पण त्यासंदर्भात आलेल्या आकडेवारीनुसार आता पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांची टक्केवारी 35 % पोहोचल्याचे सांगण्यात येते. यात प्रामुख्याने रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांचा समावेश असल्याचा स्पष्ट उल्लेख केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालात आहे.

    पण ममता बॅनर्जी यांनी भाषा आंदोलन सुरू करताना या घुसखोरीच्या विरोधात एकही शब्द काढला नाही. त्या उलट त्यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना अतिशय चतुराईने स्थलांतरित कामगारांचे लेबल चिकटवून टाकले. या लेबल द्वारे त्यांना परस्पर बंगाली म्हणजेच भारतीय नागरिकत्व प्रदान करून टाकले. पण ते प्रत्यक्षात घुसखोरीवरचे शिक्कामोर्तब ठरले.

    Mamata Banerjee took up the language movement; but through it, she denied Indian citizenship to Rohingyas and Bangladeshis!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Praniti Shinde ऑपरेशन सिंदूरला ‘तमाशा’ संबोधले; काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर टीकेची झोड

    अमेरिकेने 25 % टेरिफ लादले तरी भारत स्वतःचेच राष्ट्रहित साधेल; परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्पना ठाणकावले!!

    Jaishankar : कान उघडे ठेवून ऐका, मोदी – ट्रम्प यांच्या दरम्यान एकही फोन कॉल नाही, एस. जयशंकर यांनी विरोधकांना सुनावले