• Download App
    ममता बॅनर्जींची "दिल्लीवर स्वारी"; 5 दिवसांच्या दौऱ्यात विरोधकांची खरी मोट बांधण्याचा प्रयत्न Mamata Banerjee to make serious efforts to consolidate opposition unity

    ममता बॅनर्जींची “दिल्लीवर स्वारी”; विरोधकांची खरी मोट बांधण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे राज्य दोन तृतीयांश बहुमताने जिंकून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता “दिल्लीवर स्वारी” केली आहे. ममता बॅनर्जी कालच पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. या दौऱ्यात राष्ट्रमंचाच्या बैठकीसारखी “राजकीय नाटके” न करता त्या खऱ्या अर्थाने मोदी सरकार विरोधात सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा गांभीर्याने प्रयत्न करणार आहेत. Mamata Banerjee to make serious efforts to consolidate opposition unity

    ममता बॅनर्जींच्या दिल्ली दौऱ्याला पश्चिम बंगालमधील तिसऱ्या महाविजयाची पार्श्वभूमी आहे. त्या आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊ शकतात. पण याशिवाय त्या काँग्रेसच्या तीन नेत्यांनाही भेटणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांच्या माहितीनुसार ही फक्त सुरवात आहे. येत्या तीन दिवसांत ममता बॅनर्जी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना देखील भेटणार आहेत. त्यांच्या भेटीचा दिवस आणि वेळ अद्याप कळलेली नाही.



    ममता बॅनर्जींच्या आजच्या कार्यक्रमानुसार त्या सायंकाळी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. त्या आधी दुपारी 2 वाजता काँग्रेस नेते कमलनाथ यांना भेटणार असून 3 वाजता काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी भेट घेतील. यानंतर सायंकाळी 6 वाजता त्या काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांची भेट घेणार आहेत.

    ममतांनी आपला मनसूबा तीन-चार दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांच्या दिल्ली दौर्‍याचे राजकीय गांभीर्य वाढले आहे. या दौऱ्याला लोकसभा निवडणूक 2024 ची तयारी मानली जात आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. ममता बॅनर्जी सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटून महाआघाडी तयार करीत आहेत.

    ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले होते. त्यानंतर ममता बॅनर्जींचा हा दौरा होत आहे. उद्या ममता बॅनर्जी अन्य विरोधी नेत्यांप्रमाणेच शरद पवार यांची देखील भेट घेतील. प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीत 6 जनपथमध्ये शरद पवार सर्व विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेतील आणि विरोधकांची मोट बांधतील, अशी जोरदार राजकीय हवा निर्माण करण्यात आली होती. प्रत्यक्षात राष्ट्र मंचाच्या बैठकीच्या रुपाने हा राजकीय मोट बांधण्याचा फुगा फुटला.

    परंतु ममता बॅनर्जी यांचा पाच दिवसांचा दिल्ली दौरा यापेक्षा भिन्न आहे. त्यांचे विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न अधिक गांभीर्याने सुरू असल्याचे मानण्यास वाव आहे.

    Mamata Banerjee to make serious efforts to consolidate opposition unity

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- ते हिंसा पसरवत नव्हते; सर्वोच्च न्यायालयात सांगितले- वस्तुस्थिती तोडूनमोडून गुन्हेगार ठरवले

    Atishi’s : आतिशी यांच्या व्हिडिओवर पंजाबमध्ये गदारोळ; विरोधक म्हणाले- शीख गुरुंचा अपमान केला; म्हणाल्या- ‘कुत्र्यांचा आदर करा’ असे म्हटले होते

    MP High Court : एमपी हायकोर्टाने म्हटले- प्रोबेशनमध्ये वेतन कपात करणे अवैध, कर्मचाऱ्यांना थकबाकीसह पैसे परत करण्याचे आदेश