वृत्तसंस्था
सिलिगुडी : कुचबिहारमधील हिंसाचारात मरण पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सिलिगुडीतील प्रेस कॉन्फरन्समध्ये विडिओ कॉलवर बोलल्या.Mamata Banerjee speaks to relatives of victims of Cooch Behar violence on video call from Siliguri press conference
आपण हिंसाचारात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांशी बोलतो आहोत, असे त्यांनी मोबाईल फोन पत्रकारांनै दाखवत सांगितले.मी सध्या तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही. कारण त्यांनी मला तुमच्याकडे येऊ दिले नाही.
मी १४ एप्रिललला तुम्हाला येऊन भेटेन, असे ममता बॅनर्जींनी या कुटुंबीयांना सांगितले. यावेळी हातातला माईक फोनसमोर धरत त्या कुटुंबीयांचा आवाज ममतांनी पत्रकारांना ऐकविण्याचाही प्रयत्न केला.
बाकीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. पण यावेळी त्यांचा सूर जरासा बदललेला आढळला. त्या म्हणाल्या, की दररोज तुम्ही बंगाल बळकावण्यासाठी इथे येता.
तुमचे स्वागत आहे. तुम्ही इथे येऊन लोकांना आनंदी करा ना… त्यांना धमक्या देऊ नका. तुम्ही केंद्रीय दले इथे पाठवून लोकांना मारता आणि वर केंद्रीय दलांना क्लीन चिट देता, हे तुमचे राजकारण आहे आणि बंगालची जनता हे सहन करणार नाही, असा इशाराही ममतांनी मोदी – शहांना दिला.
Mamata Banerjee speaks to relatives of victims of Cooch Behar violence on video call from Siliguri press conference
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लस उत्सवा’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशवासीयांना 4 आवाहने, वाचा सविस्तर…
- काळजाचं पाणी करणारी घटना : बँकेच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची फक्त 500 रुपयांसाठी हत्या, मृतदेह न्यायलाही नव्हते कुटुंबाकडे पैसे
- मद्यप्रेमींवर सरकार मेहेरबान, मुंबईत लॉकडाऊन काळातही मिळेल दारू, होम डिलिव्हरीसाठी या आहेत अटी
- देशात १३ एप्रिलपासून चार दिवस बँका राहणार बंद ; १२ एप्रिलला कामे पूर्ण करा ; अन्यथा वाट पाहावी लागणार
- दिल्लीत शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग, 200 दुकाने जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान