पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोध केला होता. त्यामुळे आताही त्या लॉकडाऊन लावण्याच्या विरोधात होत्या. पण धाकट्या भावाचे कोरोनाने निधन झाल्यावर त्यांना परिस्थितीच्या गांभिर्याची जाणीव झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन लावण्याची घोषणा त्यांनी केली आहे. Mamata Banerjee realizes seriousness after brother’s death, announces lockdown in West Bengal
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोध केला होता. त्यामुळे आताही त्या लॉकडाऊन लावण्याच्या विरोधात होत्या. पण धाकट्या भावाचे कोरोनाने निधन झाल्यावर त्यांना परिस्थितीच्या गांभिर्याची जाणीव झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन लावण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन लावण्यास ममता बॅनर्जी यांचा विरोध होता. राज्यात निवडणुकीपूर्वी आणि नंतरही तृणमूल कॉँग्रेसकडून मोठमोठ्या रॅली काढल्या जात होत्या. मात्र, उद्यापासून पश्चिम बंगालमध्ये कडकडीत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे कारण म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या धाकट्या भावाचे निधन झाल्यावर त्यांना संकटाची कल्पना आली. ममता बॅनर्जी यांचे धाकटे भाऊ असीम बंडोपाध्याय यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. गेल्या महिनाभरापासून कोरोनावर उपचार घेत होते. आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यातच त्यांचा प्राणज्योत मालवली. बंडोपाध्याय त्यांचा मृत्यू झाला.
शनिवारी या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांनी लॉकडाऊनचे आदेश जारी केले. बंगालमध्ये 16 मे ते 30 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत. खासगी ऑफिस , शाळा-कॉलेज बंद राहणार आहेत. फळे, भाज्या आणि किराना दुकाने सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लोकांच्या बाहेर पडण्यावर बंदी आहे.
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरू लागले आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी बंगालमध्ये 20,846 नवे रुग्ण सापडले आहेत. 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्हिटी रेट 30 टक्यांवर गेला आहे.
Mamata Banerjee realizes seriousness after brother’s death, announces lockdown in West Bengal
महत्त्वाच्या बातम्या
- Coronavirus Vaccine राज्यात आज आणि उद्या लसीकरण नाही; कोविन अँप अपडेशनसाठी बंद राहणार
- बहुधर्मी आसामच्या मुख्यमंत्र्यांचे बांगलादेशाच्या पंतप्रधानांकडून अभिनंदन; मोदींच्या विकासवादी मार्गाने चालण्याची हेमंत विश्वशर्मांची ग्वाही
- वैकुंठ स्मशानभूमीत महिला करतात अंत्यसंस्कार ; कोरोनाच्या संकटात 15 जणींचा समाजाला मोठा हातभार
- अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन व्यथित; ब्लॉगवरील रसिकांच्या टोकदार कमेंटचा परिणाम
- आनंदाची बातमी : केंद्र सरकारतर्फे राज्यांना आणखी १९२ लाख लशीचे डोस मोफत
- सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा सरन्यायाधीशांचा प्रस्ताव