• Download App
    बांगलादेशातील घुसखोर आणि निर्वासित स्वीकारायला ममता बॅनर्जी तयार; पण तिस्ता नदीचे पाणी बांगलादेशाला द्यायला नकार!!|Mamata Banerjee ready to accept infiltrators and refugees from Bangladesh; But refuse to give Teesta river water to Bangladesh!!

    बांगलादेशातील घुसखोर आणि निर्वासित स्वीकारायला ममता बॅनर्जी तयार; पण तिस्ता नदीचे पाणी बांगलादेशाला द्यायला नकार!!

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : बांगलादेशातील घुसखोर आणि निर्वासित स्वीकारायला ममता बॅनर्जी तयार दिसता नदीचे पाणी बांगलादेशाला द्यायला मात्र नकार!!, हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याच धोरणातून आणि वक्तव्यातून समोर आले आहे.Mamata Banerjee ready to accept infiltrators and refugees from Bangladesh; But refuse to give Teesta river water to Bangladesh!!

    याची कहाणी अशी :

    बांगलादेशामध्ये आरक्षण विरोधी आंदोलन पेटले. त्यात 150 पेक्षा जास्त लोकांचे बळी गेले. तिथल्या सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण शेख हसीना सरकारला मागे घ्यायला लावले. त्याचवेळी बांगलादेशातले भयभीत लोक पश्चिम बंगाल मध्ये यायला तयार झाले. अनेकांनी घुसखोरी केली. या घुसखोरांना आणि बांगलादेशातल्या दंगलग्रस्त निर्वासितांना पश्चिम बंगाल मध्ये स्वीकारण्याची, त्यांना आश्रय देण्याची तयारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखविली. त्यांचे स्वागत करण्याची तयारी केली.



    पण त्याच्या आधीपासूनच पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशातून घुसखोरी होते आहे या घुसखोरीला ममता बॅनर्जींचा विरोध नाही. ते बंगाली नागरिक असल्याचा त्यांचा दावा आहे.

    पण त्या पलीकडे जाऊन मात्र तिस्ता नदीचे पाणी बांगलादेशाला द्यायला मात्र ममता बॅनर्जींनी नकार दर्शविला. भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान झालेला तिस्ता पाणी वाटप करार ममता बॅनर्जी नाकारला. केंद्र सरकारने तिस्ता पाणी वाटप करार करताना पश्चिम बंगाल सरकारला विचारात घेतले नाही. मी वारंवार सांगत होते, की तीस्ता नदीमध्ये पाणी कमी आहे. तिस्ता नदीचे पाणी जर बांगलादेशाला दिले, तर उत्तर बंगाल मधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण होईल. तिथे दुष्काळ पडेल, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.

    पण प्रामुख्याने तिस्ता पाणी वाटप करार भारत आणि बांगलादेश अशा दोन देशांदरम्यान असताना पश्चिम बंगालच्या राज्य सरकारला विचारले नाही म्हणून मला त्या बॅनर्जींनी मोदी सरकार विरुद्ध तक्रारी केल्या. पण त्यामुळेच ममता बॅनर्जींची पाणी द्यायला नकार, पण घुसखोर आणि निर्वासितांना स्वीकारायला तयार!!, अशी धोरणातली विसंगती मात्र जनतेसमोर आली.

    Mamata Banerjee ready to accept infiltrators and refugees from Bangladesh; But refuse to give Teesta river water to Bangladesh!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही