mamata banerjee : पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजय निश्चित झाला आहे रविवारी त्या म्हणाल्या की, मी भवानीपूर विधानसभा पोटनिवडणूक 58,832 मतांच्या प्रचंड फरकाने जिंकले आहे आणि विधानसभेच्या सर्व प्रभागांमध्ये जिंकलो आहे.” कोलकातामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, “येथे (भवानीपूरमध्ये) सुमारे 46% लोक बंगाली आहेत. या सर्वांनी मला मत दिले आहे. पश्चिम बंगालचे लोक भवानीपूरकडे पाहत आहेत, ज्यामुळे मला प्रेरणा मिळाली आहे.” mamata banerjee reaction after huge win in bhabanipur assembly bypolls
प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजय निश्चित झाला आहे रविवारी त्या म्हणाल्या की, मी भवानीपूर विधानसभा पोटनिवडणूक 58,832 मतांच्या प्रचंड फरकाने जिंकले आहे आणि विधानसभेच्या सर्व प्रभागांमध्ये जिंकलो आहे.” कोलकातामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, “येथे (भवानीपूरमध्ये) सुमारे 46% लोक बंगाली आहेत. या सर्वांनी मला मत दिले आहे. पश्चिम बंगालचे लोक भवानीपूरकडे पाहत आहेत, ज्यामुळे मला प्रेरणा मिळाली आहे.”
पोटनिवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर माध्यमांशी बोलताना ममतांनी केंद्र सरकारवर सत्तेपासून दूर करण्याचा कट रचल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, “बंगालमध्ये निवडणुका सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने आम्हाला (सत्तेवरून) हटवण्याचे षडयंत्र रचले. मी निवडणूक लढवू नये म्हणून माझ्या दुखापत झाली. 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेतल्याबद्दल आम्हाला आणि निवडणूक आयोगाला मतदान केल्याबद्दल मी जनतेची आभारी आहे.
कोलकाता येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भवानीपूरच्या लोकांनी नंदीग्राममध्ये रचलेल्या कटाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम जागेवरून भाजपचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांच्याविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.
mamata banerjee reaction after huge win in bhabanipur assembly bypolls
महत्त्वाच्या बातम्या
- कायदा आणि सुव्यवस्थेच्या बैठकीत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे काय काम? सीएम चन्नींसमोर नवे संकट
- Bhawanipur By-Poll Results : मतमोजणीच्या 11 फेऱ्या पूर्ण; ममता बॅनर्जी 34 हजार मतांनी पुढे, तृणमूलकडून गुलालाची तयारी
- “खोलवर शिरून” बाॅलिवूडला खणती लावायला सुरुवात; बड्या धेंडांना नार्कोटिक्स ब्यूरो सोडणार नाही!!
- “जर मदत दिली नाही तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही”, राजू शेट्टी यांचा इशारा्र
- Shivsena Audio clip : रामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद ; नांदेड येथे फडणवीस यांची प्रतिक्रिया