Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान जसजसे जवळ येत आहेत तसा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्याच बरोबर ममता बॅनर्जी कॅम्पमधून भाजपवर जास्त तोफा डागल्या जात आहेत. त्यांचे बेछूट बार काढले जात आहेत. असाच एक बेछूट बार खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी काढला आहे. Mamata Banerjee more popular than Modi; Right now the yogi decides everything; Strange claim by MP Abhishek Banerjee
वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान जसजसे जवळ येत आहेत तसा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्याच बरोबर ममता बॅनर्जी कॅम्पमधून भाजपवर जास्त तोफा डागल्या जात आहेत. त्यांचे बेछूट बार काढले जात आहेत. असाच एक बेछूट बार खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी काढला आहे.
ते म्हणाले की, ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा लोकप्रिय आहेत. त्यामुळेच त्यांना रोमच्या आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेला जाण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली नाही. ममता बॅनर्जी यांच्या लोकप्रियतेवर भाजपचे नेते जळतात. त्यांनी लोकशाही धाब्यावर बसवली आहे आणि तसेही सध्या सगळे काही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ठरवत असतात, असा अजब दावा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केला.
त्याचवेळी ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार तोफा डागल्या. त्या म्हणाल्या की, मला केंद्र सरकारने अमेरिका, चीन, इंग्लंड या देशात जाऊ दिले नाही. कारण त्यांना माझी भीती वाटते. केंद्रातल्या सरकार विरुद्ध कोणी काही बोलले की ते ईडी, सीबीआय त्यांच्या मागे लावतात. पण आम्ही घाबरणार नाही. मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशी तीस वर्ष टक्कर दिली आहे. काँग्रेसने त्यांच्याशी जुळवून घेतले म्हणून मी काँग्रेस सोडली. आता काँग्रेसचे नेते भाजपशी जुळवून घेत आहे. पण आम्ही भाजपला पराभूत केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.
ममता बॅनर्जी तीन दिवसांपासून भवानीपूरमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांना नंदिग्राम मधला पराभव चांगला जिव्हारी लागला आहे. तसेच धडाही शिकवून गेला आहे. त्यामुळे त्या आता कोणतीही राजकीय रिस्क घेऊ इच्छित नाहीत. त्यामुळेच त्या भाजपवर सर्व आरोप करून घेताना दिसत आहेत.
Mamata Banerjee more popular than Modi; Right now the yogi decides everything; Strange claim by MP Abhishek Banerjee
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई-पुण्यात झोपडपट्ट्यांमध्ये नक्षल चळवळीचा प्रचार – प्रसार; मुख्यमंत्र्यांनी अमित शहांसमोर व्यक्त केली चिंता
- Bhabanipur by Polls : कोलकाता डीसीपीवर भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार
- Nagpur Education Policy : NEPला RSS किंवा ‘नागपूर शिक्षण धोरण’ म्हटले तर आनंदच मुख्यमंत्री बोम्मई
- कोरोना कालावधीतील सरकारी खर्चावरील निर्बंध उठले, अर्थ मंत्रालयाच्या सूचना, विभाग आता बजेटच्या अंदाजानुसार खर्च करू शकतील
- ‘कोणीही टाळी वाजवली नाही’, चिदंबरम यांचा पीएम मोदींच्या यूएनजीएच्या भाषणावर टोमणा, सिब्बल यांचीही टिप्पणी