Thursday, 8 May 2025
  • Download App
    अहो बाईंनी केली न्यायाधीशच बदलण्याची मागणी, ममता बॅनर्जी यांनी घेतली न्यायव्यवस्थेवरच शंका। Mamata Banerjee demanded to replaced the judge , Mamata Banerjee's Doubts over the judiciary

    अहो बाईंनी केली न्यायाधीशच बदलण्याची मागणी, ममता बॅनर्जी यांनी घेतली न्यायव्यवस्थेवरच शंका

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम विधानसभा निवडणुकीत दारुण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव झाला होता. नंदीग्रामच्या रणसंग्रामात पराभवानंतर न्यायालयात गेलेलल्या ममता बॅनर्जी यांनी आता चक्क न्यायाधीशच बदलण्याची मागणी केली आहे. Mamata Banerjee demanded to replaced the judge , Mamata Banerjee’s Doubts over the judiciary

    ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कोलकाता उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून विनंती केली की, नंदीग्राममधील भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी तिची याचिका दुसर्‍या खंडपीठाकडे पाठवावी. कारण या याचिकेवर सुनावणी घेणारे न्यायमूर्ती कौशिक चंदा हे भाजपचे पूर्वी सक्रिय सदस्य होते. त्यामुळे निवडणूक याचिकेवरील निर्णयावर त्याचा राजकीय परिणाम होण्याची शक्यता आहे. ममता यांनी हे प्रकरण दुसर्‍या खंडपीठाकडे पाठवावे, अशी विनंती मुख्य न्यायाधीशांना केली आहे.



    तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार वकिलांकडून दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, उच्च न्यायालयातील स्थायी न्यायाधीश म्हणून संबंधित न्यायाधीशांच्या नावाला मान्यता देण्याबाबतही त्यांनी (ममता) आक्षेप घेतला आहे. संबंधित न्यायाधीश एका पक्षाचे सक्रिय सदस्य होते त्यामुळे त्यांचा निकाल पूर्वग्रहदूषित असू शकतो. निवडणूक याचिका दुसर्‍या खंडपीठाकडे पाठवावी यासाठी हे पत्र कार्यवाह सरन्यायाधीशांसमोर दिले आहे. जेणेकरून कोणताही पक्षपात होऊ नये यासाठी ममतांच्या वकिलांनी विनंती केली आहे.

    नंदीग्राम येथून शुभेंदू अधिकारी यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या ममतांच्या याचिकेवरील सुनावणी 24 जूनपर्यंत न्यायमूर्ती कौशिक यांनी तहकूब केली. शुभेंदू सध्या राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.

    वकीलांकडून निषेध

    दरम्यान, तृणमूल काँग्रेस प्रमुखांची निवडणूक याचिका न्यायमूर्ती कौशिक यांच्याकडे सोपविल्याबद्दल वकिलांच्या गटानेदेखील उच्च न्यायालयासमोर निषेध केला. एका वकिलाने सांगितले की, “न्यायाधीशांशी आमचे वैयक्तिक वैर नाही. पण ते एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांनी स्व:तहून या खटल्यातून बाजूला व्हायला हवे.”

    Mamata Banerjee demanded to replaced the judge , Mamata Banerjee’s Doubts over the judiciary

    Related posts

    Rajnath Singh : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत राजनाथ सिंह यांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले…

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर अन् इतर सीमावर्ती शहरांमध्ये शैक्षणिक संस्था बंद, आदेश जारी

    Amit Shah : ऑपरेशन सिंदूर : अमित शहा अ‍ॅक्शनमध्ये, सीमावर्ती राज्यांच्या बैठकीत दिल्या विशेष सूचना