• Download App
    tejasvi Yadav RJD राहुल गांधींनी 50 ठिकाणी यात्रा काढल्याचे मूसळ केरात; तेजस्वी यादव 243 जागा लढवायला तयार!!

    राहुल गांधींनी 50 ठिकाणी यात्रा काढल्याचे मूसळ केरात; तेजस्वी यादव 243 जागा लढवायला तयार!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बिहारमध्ये मतदान चोरीच्या आरोपावरून राहुल गांधींनी तब्बल 50 ठिकाणी यात्रा काढल्याचे मूसळ एका झटक्यात केरात गेले. कारण तेजस्वी यादव यांनी बिहार मधल्या सगळ्या 243 मतदारसंघांमध्ये लढाईची तयारी चालवली. tejasvi Yadav RJD

    – मुख्यमंत्रीपदावरून खरे मतभेद

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी एकत्र येत 50 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतं चोरी विरोधातली यात्रा काढली. या यात्रेदरम्यान राहुल गांधींना आम्ही पंतप्रधान करायला तयार आहोत. तुम्ही आम्हाला मतदान करा, असे आवाहन तेजस्वी यादव यांनी केले. परंतु राहुल गांधींनी काही तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नाही. ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर काही बोलले नाहीत. तेजस्वी यादव मुख्यमंत्री होतील, असे राहुल गांधी म्हणाले नाहीत. उलट काँग्रेसची संघटना वाढविण्यावर त्यांनी भर दिला.



    त्याचा दुष्परिणाम व्हायचा तोच झाला महागठबंधन मध्ये राहुल गांधींची काँग्रेस आपल्याला हवा तसा प्रतिसाद देत नाही हे पाहून तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने स्वतंत्रपणे 243 जागा लढवण्याची तयारी चालवली. स्वतः तेजस्वी यादव यांनी तशी घोषणा करून टाकली. पण त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते “जागेवर” आले. महागठबंधन मध्ये सर्व ठीकठाक आहे. आमच्यात कुठले मतभेद नाहीत. आम्ही महागठबंधन म्हणूनच निवडणूक लढवणार आहोत. तेजस्वी यादव यांची तशी बोलण्याची स्टाईल आहे. पण त्याने महागठबंधनवर वाईट परिणाम होणार नाही, असा दावा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला.

    Major rift in congress and tejasvi Yadav RJD in Bihar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Shashi Tharoor : शशी थरूर म्हणाले- परराष्ट्र धोरण एखाद्या पक्षाचे नसते, तर देशाचे असते; पाकिस्तानच्या धोक्याकडे दुर्लक्ष करू नका

    Amit Shah : शहा म्हणाले- दिल्ली कार स्फोटात 40 किलो स्फोटके वापरले; पहलगाम हल्ला देशाचे विभाजन करण्याचा कट होता

    Mehbooba Mufti : जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने विचाराधीन कैद्यांच्या हस्तांतरणाची याचिका फेटाळली; म्हटले- याचिका राजकीय फायद्यासाठी दाखल केली