Wednesday, 7 May 2025
  • Download App
    जातनिहाय जनगणनेवरून I.N.D.I.A आघाडीत भेगा; ममतांचा वेगळा सूर!! Major cracks in I.N.D.I.A over caste base census, mamata banerjee oppose it

    जातनिहाय जनगणनेवरून I.N.D.I.A आघाडीत भेगा; ममतांचा वेगळा सूर!!

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : केंद्रातील मोदी सरकार विरोधात सर्व विरोधकांनी एकजूट करून I.N.D.I.A आघाडी स्थापन केली असली तरी त्यातल्या राजकीय विसंगती दररोज बाहेर येतात. अशीच एक मोठी विसंगती आता बाहेर आली आहे. आणि ती जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर आहे. Major cracks in I.N.D.I.A over caste base census, mamata banerjee oppose it

    I.N.D.I.A आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल या पक्षांनी देशात जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी लावून धरली आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा त्याला विरोध आहे.

    जातनिहाय जनगणनेतून भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांना हिंदी पट्ट्यात राजकीय फायदा होईल आणि प्रादेशिक पक्षांचा तोटा होईल, असा तृणमूल काँग्रेसचा होरा आहे. अर्थात हिंदी पट्ट्यात तृणमूल काँग्रेसचे अजिबातच अस्तित्व नाही तरी देखील तो मुद्दा त्या पक्षाने पुढे केला आहे.



    प्रत्यक्षात जातनिहाय जनगणना हा मुद्दा पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये तृणमूल काँग्रेसला अनुकूल नाही. कारण पश्चिम बंगालचे राजकारण जातनिहाय असण्यापेक्षा ते वर्गनिहाय आहे आणि तिथे कम्युनिस्टांचे प्राबल्य राहिल्यामुळे भद्र लोक देखील कम्युनिस्ट अथवा तृणमूळ काँग्रेसच्या वळचणीला जाऊन तिथे सत्ताधारी बनले आणि आजही ती व्यवस्था तृणामूळ काँग्रेसच्या रूपाने कायम आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे.

    जातनिहाय जनगणना करून आपण भाजपच्या हातात स्वतःहून ओबीसी व्होट बँक देऊन टाकू, असा तणमूळ काँग्रेसचे खासदार सुगता रॉय यांनी युक्तिवाद केला आहे, पण तृणमूल काँग्रेसला I.N.D.I.A आघाडीत राहायचे आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय ममता बॅनर्जी याच स्पेन दौऱ्यावरून परत आल्यानंतर घेतील, असा खुलासाही सुगता रॉय यांनी करून टाकला आहे.

    दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, राजस्थान या हिंदी पट्ट्यात जातनिहाय जनगणनेचा फायदा आपल्याला होऊ शकतो, असा काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल यांचा होरा आहे. प्रत्यक्षात त्यासंदर्भात केंद्र सरकार अद्याप निर्णय घ्यायचा आहे, पण तृणमूल काँग्रेस सारख्या प्रबळ पक्षाने त्या मुद्द्यावर I.N.D.I.A आघाडी पेक्षा वेगळा सूर काढल्याने आघाडीतल्या नेत्यांची चिंता सरकार पेक्षा वाढली आहे.

    Major cracks in I.N.D.I.A over caste base census, mamata banerjee oppose it

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- भारतात आरक्षण रेल्वेच्या डब्यासारखे; आत असलेल्यांना वाटते इतरांनी आत येऊ नये

    PM Modi : पाकिस्तानवर एअर स्ट्राइकपूर्वी PM म्हणाले होते- भारताचे पाणी भारतासाठी वाहणार

    Air strike on Pakistan : पाकिस्तानवर हवाई हल्ला, आज 244 ठिकाणी मॉक ड्रिल; हल्ल्यापासून वाचण्याचे मार्ग शिकवले जातील